Jasprit Bumrah : टीम इंडियाच्या मिशनला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह T20 World Cup मधून बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jasprit bumrah

Jasprit Bumrah : टीम इंडियाच्या मिशनला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह T20 World Cup मधून बाहेर

Jasprit Bumrah Out T20 World Cup : टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पाठीच्या समस्येमुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. पीटीआयला बीसीसीआयच्या एका सूत्रांनी माहिती दिली की, त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही, मात्र तो चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही तो बाहेर झाला आहे.

हेही वाचा: T20 World Cup : अर्शदीप सिंग-दीपक चहरने सीनियर्सचे वाढवले टेन्शन, केला मोठा दावा!

बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही खेळला नव्हता. त्यांची जागा दीपक चहरला संघात घेतला होता. बुमराहने आशिया कपमध्ये न खेळल्यानंतर पुनरागमन केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो खेळला होता.

हेही वाचा: T20 World Cup : टीम इंडिया 'या' दिवशी होणार रवाना, BCCI करणार 4 खेळाडूंचा खर्च

मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात बुमराहला प्लेइंग-11 मध्ये स्थान न मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पुनरागमनानंतरही खेळाडू विश्रांती कशी घेऊ शकतो? त्यानंतरही तो जखमी आहे का, या चर्चेला जोर आला होता. बुमराह पुन्हा जखमी आहे का? विश्वचषकापूर्वी त्याला संघात आणण्यासाठी निवडकर्त्यांची घाई आहे का? आता त्याच्या बाहेर पडण्याच्या वृत्ताने या प्रश्नांवर शिक्कामोर्तब केले आहे.

दुखापतीमुळे बुमराह आशिया कपमध्ये खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थिती टीम इंडिया या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकले नाही. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की T20 वर्ल्ड कपमध्ये बुमराहची जागा कोण घेणार? सध्या मोहम्मद शमी किंवा स्टँडबाय म्हणून निवडले आहे तर दीपक चहर यांचे नाव आघाडीवर आहे. कोरोना संसर्गामुळे शमी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही. मात्र आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

हेही वाचा: दुखापतीने त्रस्त टीम इंडिया T20 World Cup चा संघ बदलणार?

ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.