दुखापतीने त्रस्त टीम इंडिया T20 World Cup चा संघ बदलणार?

दुखापती टीम इंडिया जिंकणार का वर्ल्ड कप? 'या' खेळाडूंनी वाढवले टेन्शन
t20 world cup squad team india
t20 world cup squad team india

T20 World Cup Squad Team India Change : आता टी-20 विश्वचषकचा थरार रंगण्यासाठी फक्त दोन आठवडे उरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकासाठी जवळपास 16 संघ आमनेसामने येणार आहेत. भारताने आपला संघ जाहीर केला असला तरी दुखापतीमुळे तो सतत त्रस्त आहे. टीम इंडियाला अजूनही संघात बदल करण्याची संधी आहे. शेवटच्या क्षणी काही खेळाडूंना टी-20 विश्वचषकाच्या संघात आणले जाऊ शकते.

t20 world cup squad team india
T20 World Cup : अर्शदीप सिंग-दीपक चहरने सीनियर्सचे वाढवले टेन्शन, केला मोठा दावा!

संघ कसा आणि कधी बदलता येईल?

आयसीसीच्या नियमांनुसार संघ 9 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या टी-20 विश्वचषक संघात बदल करू शकतात. त्याचबरोबर थेट सुपर-12 मध्ये पोहोचलेल्या संघांना ही संधी 15 ऑक्टोबरपर्यंत आहे. म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत टीम इंडिया आपल्या संघात बदल करू शकते. यानंतरही काही घडले तर आयसीसीची विशेष परवानगी घेऊन भारत आपल्या संघात बदल करू शकतो.

t20 world cup squad team india
Team India : बुमराह भुवी नसेल तरी भारतीय गोलंदाजी एक नंबर

टीम इंडिया दुखापतीने हैराण

टी-20 विश्वचषकासाठी जेव्हा संघ जाहीर होणार होता तेव्हापासूनच टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. सर्वप्रथम रवींद्र जडेजाला दुखापत झाली, त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. त्यानंतर दीपक हुड्डाला दुखापत झाली, जो T20 विश्वचषक संघाचा भाग आहे. यानंतर जसप्रीत बुमराहबद्दल सतत शंका व्यक्त केली जात आहे. कारण तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला नव्हता.

t20 world cup squad team india
T20 World Cup : दुखापती टीम इंडिया जिंकणार का वर्ल्ड कप? 'या' खेळाडूंनी वाढवले टेन्शन

ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com