टीम बाहेर गेलेल्या बुमराचे भावनिक ट्विट

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून बाहेर जावे लागले आहे. त्याच्या जागी संघात उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आता बुमराने ट्विटवर आपली भावना व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून बाहेर जावे लागले आहे. त्याच्या जागी संघात उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आता बुमराने ट्विटवर आपली भावना व्यक्त केली आहे. 

कोहलीला भासतीये धोनीची कमतरता; म्हणून रोहितकडे मागितली ही मदत​

''खेळ म्हटलं की दुखापती येणारचं. तुम्ही मला लवकर बरे होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. माझी मान ताठ आहे आणि मी जोरदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे,'' अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी श्रीलंकेला मिळाले करोडो रुपये?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah posts an emotional message on twitter