VIDEO : बुमराहचा बॉल नको त्या ठिकाणी लागला अन् रोहित खालीच बसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah Sharp In swinger Hit Rohit Sharma groin region Video Gone Viral

VIDEO : बुमराहचा बॉल नको त्या ठिकाणी लागला अन् रोहित खालीच बसला

लिसेस्टर : भारताचा कसोटी संघ इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी दाखल झाला आहे. आज भारतीय संघ आणि लिसेस्टरशायर यांच्यात 4 दिवसीय सराव सामना सुरू होत आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघातील काही खेळाडू भारताविरूद्धच लिसेस्टरशायर संघाकडून खेळत आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Jasprit Bumrah Sharp In swinger Hit Rohit Sharma groin region Video Gone Viral)

हेही वाचा: रोहितने आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेअर केले 'खास' पत्र

दरम्यान, लिसेस्टरशायर संघाकडून चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे चार खेळाडू खेळत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने शुभमन गिलसोबत डावाची सुरूवात केली. दरम्यान, लिसेस्टरशायर कडून खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहचा एक अखूड टप्प्याचा चेंडू रोहित शर्माला लागला. यानंतर वेदनेने रोहित शर्मा खाली बसला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. शुभमन गिल 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा देखील 25 धावांची भर घालून माघारी गेला. त्याला रोमन वॉकरने बाद केले. रोमनने हनुमा विहारीला देखील 3 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला. तर प्रसिद्ध कृष्णाने श्रेयस अय्यरला भोपळा देखील फोडू दिला नाही. रोमनने 13 धावांवर जडेजाला बाद करत भारताला 81 धावांवर पाचवा धक्का दिला.

हेही वाचा: विराट, रोहित आता टी-20 मध्ये... कपिल देव यांचं 'बोल्ड' वक्तव्य

पावसाच्या व्यत्यसामुळे खेळ काही काळ थांबला होता. मात्र त्यानंतर विराट कोहलीने श्रीकार भरतच्या साथीने डाव सावरत संघाला शतक पार करून दिले. मात्र पुन्हा एकदा पावसाच्या व्यत्यामुळे खेळ थांबला. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 5 बाद 133 धावा झाल्या होत्या. विराट कोहली 32 तर भरत 11 धावा करून नाबाद होते.

Web Title: Jasprit Bumrah Sharp In Swinger Hit Rohit Sharma Groin Region Video Gone Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top