
विराट, रोहित आता टी-20 मध्ये... कपिल देव यांचं 'बोल्ड' वक्तव्य
टीम इंडियाचा (Team india) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या फॉर्मपासून झुंजतोय. त्याच्या या यादीत रोहित शर्मा आणि केएल राहुलदेखील आहे. या इनफॉर्म कामगिरीवर भारताच्या माजी क्रिकेटरपासून अनेक दिग्गज खेळाडू टीका करताना दिसत आहे. दरम्यान कपिल देव या दिग्गज तिन्ही खेळाडूंबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.(kapil dev statement rohit sharma virat kohli and kl rahul not be the part indian t20 team)
हेही वाचा: Sidhu Moose Wala स्टाईलमध्ये सर्फराजचं 'शतकी' सेलिब्रेशन
जर हे तीन खेळाडू टी-20 फॉरमॅटमध्ये त्यांच्या स्ट्राइक रेटवर काम करत नसतील तर त्यांच्या जागी नवीन खेळाडू घेण्याचा विचार केला पाहिजे. असा इशारा कपिल देव यांनी दिला. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल दरम्यान विराट आणि रोहित अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करू शकले नाहीत, तर केएल राहुलवर त्याच्या संथ फलंदाजीची टीका झाली.
एक यु ट्यूब चॅनेलवर संदाव साधताना कपिल देव यांनी या तिघांवर भाष्य केलं आहे. या तिघांच्या स्ट्राइक रेटबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'या सर्वांचे नाव मोठे आहे आणि त्याचा दबाव या तिघांवरही आहे, जे होऊ नये. तुम्ही निर्भयपणे क्रिकेट खेळले पाहिजे. हे तिघेही असे खेळाडू आहेत जे 150-160 च्या स्ट्राइक रेटने धावा करू शकतात. जेव्हा आम्हाला मोठ्या धावसंख्येची गरज असते तेव्हा तिघेही मोक्याच्या क्षणी बाद होतात.
हेही वाचा: स्पर्धा सुरू असतानाच महिला स्विमरला आली चक्कर; बुडत असताना....
मला वाटते की दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि जर तसे झाले नाही तर तुम्हाला खेळाडू बदलण्याची गरज आहे. मोठा खेळाडू म्हणजे मोठा प्रभाव पाडणे, मोठे नाव होऊन तुम्ही संघात राहू शकत नाही, संघात राहण्यासाठी मोठी कामगिरी करावी लागते. असे स्पष्ट मत कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे.
Web Title: Kapil Dev Statement Rohit Sharma Virat Kohli And Kl Rahul Not Be The Part Indian T20 Team
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..