Jasprit Bumrah Vs Temba Bavuma
esakal
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी जसप्रीत बुमराहने पाच बळी घेत मोठा विक्रम केला आहे. त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांवर रोखलं. मात्र, या कामगिरीपेक्षा त्याने टेम्बा बमुआबाबत केलेल्या विधानाची चर्चा सर्वाधिक रंगली. यावेळी त्याने बामुआला बुटका असं म्हटलं तसेच त्याला अश्लील शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून आयसीसी बुमराहवर कारवाई करण्याची शक्यता आहे.