'बुमराहच्या वर्ल्ड क्लास रिव्हर्स स्विंगमुळं पडलो तोंडावर' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

'बुमराहच्या वर्ल्ड क्लास रिव्हर्स स्विंगमुळं पडलो तोंडावर'

England vs India 4th Test : ओव्हलच्या मैदानातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. चौथ्या कसोटीतील अखेरच्या दिवशी बुमराहच्या भेदक माऱ्याने सामन्याला कलाटणी दिली, असे मत यजमान इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने (Joe Root) व्यक्त केले आहे. बुमराहने वर्ल्ड क्लास रिव्हर्स स्विंगचा मारा करुन सामना भारताच्या बाजूने वळवला. असे तो म्हणाला. भारतीय संघाने ओव्हलच्या मैदानात सर्वोच्च कामगिरी केली. यावेळी त्याने बुमराहवर कौतुकाचा वर्षावही केला.

इंग्लंडने दुसऱ्या डावातील 61 व्या षटकात 2 बाद 141 धावा केल्या होत्या. यजमानांनी सामन्यावर पकड मिळवल्याचे चित्र दिसत होते. पण बुमराहने ओली पोप (Ollie Pope) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांना आउट करत मध्यफळीतील भरवशाच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्याच्या या कामगिरीवर रुट म्हणाला की, "बुमराह सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केली. जागतिक दर्जाची गोलंदाजी करुन त्याने टीमच्या यशात मोठे योगदान दिले."

हेही वाचा: सामना स्थगित होऊनही मेस्सी तासभर मैदानातच; जाणून घ्या कार

फलंदाजांसाठी अनूकुल असलेल्या खेळपट्टीवर आम्ही मोठी आघाडी घेऊ शकलो नाही. पहिल्या डावात आम्ही आणखी धावा करायला हव्या होत्या. जर पहिल्या डावात आणखी 100 + धावा केल्या असत्या तर सामन्याचा निकाल आणखी वेगळा दिसला असता, असेही रुट म्हणला. ज्यावेळी सामन्यावरील पकड मजबूत करायची होती त्यावेळी आम्ही कमी पडलो. दिवसभरात आम्ही 10 विकेट गमावल्या. ही कामगिरी निराशजनक आहे, असेही त्याने कबूल केले.

हेही वाचा: IND vs ENG : टीम इंडियाच्या विजयामागची पाच कारणं...

फलंदाजांसोबतच रुटने ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे पराभव ओढावल्याचे सांगितले. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी सलामीवीर रोहित शर्मासर अन्य फलंदाजांचे कॅच सोडले. रॉरी बर्न्सने दुसऱ्या डावात रोहित शर्माचा स्लिपमध्ये सोपा कॅच सोडला होता. त्यावेळी तो अवघ्या 22 धावांवर खेळत होतो. जीवदान मिळाल्यानंतर रोहितने 127 धावांची खेळी केली होती.

Web Title: Jasprit Bumrahs World Class Reverse Swing Over On The Last Day Of Oval Test Was The Turning Point Of The Match Joe Root

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..