Devendra Jhajharia First Para Athlete to Receive Padma Bhushan
Devendra Jhajharia First Para Athlete to Receive Padma Bhushan

पद्म भुषण सन्मान मिळवणारा देवेंद्र झांजरिया ठरला पहिला पॅरा अ‍ॅथलिट

भारताचा दिग्गज पॅरा अ‍ॅथलिट (Para Athlete) देवेंद्र झांजरियाला (Devendra Jhajharia) भारताचा तसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्म भुषण (Padma Bhushan) देऊन नावाजण्यात आले. विशेष म्हणजे पद्म भुषण मिळवणारा तो पहिलाच पॅरा अ‍ॅथलिट ठरला. सोमवारी 40 वर्षाच्या देवेंद्र झांजरियाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार देण्यात आला. (Devendra Jhajharia First Para Athlete to Receive Padma Bhushan)

Devendra Jhajharia First Para Athlete to Receive Padma Bhushan
INDW vs BANW: ढासळणाऱ्या फलंदाजीला यस्तिकाचा टेकू

भालाफेकपटू (Javelin Thrower) झांजरियाने अनेक पॅरालंम्पिक स्पर्धेत पदके मिळवली आहे. त्याने 2004 च्या पॅरालंम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. विशेष म्हणजे ही त्याची पहिलीच पॅरालंम्पिक होती. त्यानंतर त्याने रिओ पॅरालंम्पिक स्पर्धेत देखील सवर्णकामगिरी केली होती. गेल्यावर्षी पार पडलेल्या टोकियो 2020 पॅरालंम्पिक स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले.

Devendra Jhajharia First Para Athlete to Receive Padma Bhushan
भारतीय फुटबॉल संघामध्ये कोल्हापूरच्या अनिकेत जाधवची निवड

भालाफेकीत F46 प्रकारात खेळणाऱ्या झांजरियाने आतापर्यंत चार पॅरालंम्पिक (Paralympics) पदके जिंकली आहे. त्याला गेल्या वर्षी पद्म पुरस्काराने नावाजण्यात आले होते. यंदा त्याला पद्म भुषण पुरस्कार देण्यात आला. यानंतर त्याने 'इतिहासात पहिल्यांदाच पॅरा अ‍ॅथलिटला पद्म भुषण पुरस्कार मिळाला आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आता माझी माझ्या देशाप्रती जबाबदारी अधिक वाढली आहे. मला आता भारतासाठी अजून पदके जिंकायची आहेत.' झांजरिया पुढे म्हणाला, 'मी तरूणांना कष्ट करण्याचा सल्ला देईन. एका मिनिटाचे कष्ट तुम्हाला काहीही मिळवून देऊ शकत नाहीत. मी गेल्या 20 वर्षापासून कष्ट करतोय. मी 2002 मध्ये माझे पहिले सुवर्ण पदक पटकावले होते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com