Jofra Archer : MI ची स्पीडगन अखेर अवतरली मैदानात, IPL 2023 मध्ये मुंबईची ताकद वाढली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jofra Archer IPL 2023

Jofra Archer : MI ची स्पीडगन अखेर अवतरली मैदानात, IPL 2023 मध्ये मुंबईची ताकद वाढली!

IPL 2023 Jofra Archer : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या आधी मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. जोफ्रा आर्चर इंग्लंड विरुद्ध अबुधाबी येथे इंग्लंड लायन्ससाठी तीन दिवसीय सामना खेळत आहे. इंग्लंड संघाला 1 ते 21 डिसेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, त्या मालिकेसाठी इंग्लंड संघाने सराव सामना आयोजित केला आहे. जोफ्रा आर्चरने त्या सराव सामना सलामीवीर जॅक क्रॉलीला आपल्या बाउन्सरने अडचणीत आणले होते.

हेही वाचा: fifa world cup 2022 : पाच मिनिटांतील चुकांनी घात केला!

इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने मार्च 2021 मध्ये शेवटचा सामना खेळला होता, तर जुलै 2021 मध्ये त्याने शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट खेळताणा दिसला होता. त्यानंतर कोपराची दुखापत आणि पाठीत फ्रॅक्चर झाल्याने आर्चर बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला आहे. आर्चर पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंडच्या संघात नाही, पण त्याने इंग्लंड लायन्ससाठी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे लवकरच तो इंग्लंड संघातही पुनरागमन करताना दिसत आहे.

हेही वाचा: fifa world cup 2022 : सौदीकडून अर्जेंटिनावरचा विजय सुट्टी देऊन साजरा

आयपीएल फ्रँचायझी टीम मुंबई इंडियन्ससाठी आर्चरचे पुनरागमन ही आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या मोसमात वेगवान गोलंदाज मुकला होता. जर तो या हंगामासाठी उपलब्ध असेल तर जसप्रीत बुमराह सोबत तो विरोधी फलंदाजांसाठी सर्वात धोकादायक असू शकतात.