शेन वॉर्नच्या आठवणीत बटलर भावुक; राजस्थान १४ वर्षांनी फायनलमध्ये| jos butler sanju samson got emotional while remembering shane warne | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jos buttler
शेन वॉर्नच्या आठवणीत बटलर भावुक; राजस्थान १४ वर्षांनी फायनलमध्ये

शेन वॉर्नच्या आठवणीत बटलर भावुक; राजस्थान १४ वर्षांनी फायनलमध्ये

राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. फायनलमध्ये पोहचण्यासाठी राजस्थानला १४ वर्ष लागलं. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली असताना राजस्थानची टीम फायनलमध्ये पोहचली अन् ट्रॉफीवर आपले नाव कोरले. शानदार विजयानंतर जोस बटलर आणि कॅप्टन संजू सॅमसन दोघेही भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. दोघांनीही शेन वॉर्नसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा: Jos Buttler : बटलरने एका शतकात केली विराटच्या दोन विक्रमांची शिकार

आरसीबीविरुद्ध राजस्थानला विजय मिळवून देण्यात बटलरने मोलाचे योगदान दिलं. त्याने ६० चेंडूनत १० चौकार आणि ६ षटकार ठोकत आपले नाबात १०६ धावांची खेळी करत शतक ठोकले. संघाच्या विजयानंतर बटलरला शेन वॉर्न आठवला. राजस्थानच्या संघासाठी शेन वॉर्न एक प्रभावशाली व्यक्ती होता. पहिल्या सत्रात संघाला यश मिळवून दिल्याबद्दल आम्हाला त्याची खूप आठवण येते, पण आम्हाला माहित आहे की, तो आज आमच्याकडे मोठ्या अभिमानाने पाहत आहे.”

आयपीएल 2008 च्या फायनलच्या स्पर्धेला उजाळा देताना संजू सॅमसन म्हणाला, "मी खूप लहान होतो आणि आयपीएलचा तो पहिला सिझन होता. मला आठवते की, मी केरळमध्ये कुठेतरी अंडर-16 मॅच खेळत होतो. तिथे मी मित्रांसोबत मॅच पाहिली होती, मला आठवतंय. ती शेवटची धाव सोहेल तन्वीरने शेन वॉर्नसोबत घेतली होती. तो एक अतिशय संस्मरणीय क्षण होता."

हेही वाचा: पाकिस्तानपेक्षा बांगलादेश T20 लीगमध्ये जास्त पैसा; पण तरी भारतापेक्षा मागेच!

काल झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना पाटीदारच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरआरने ही धावसंख्या 11 चेंडू राखून तीन विकेट्स गमावून पूर्ण केली. राजस्थानकडून जोस बटलरने 60 चेंडूंत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 106 धावांची खेळी केली.

राजस्थान रॉयल्सचा सामना आता 29 मे रोजी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सशी होणार आहे.

Web Title: Jos Butler Sanju Samson Got Emotional While Remembering Shane Warne

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top