England Overcome Red Card, Hostile Crowd to Beat Mexico 3-2
esakal
Mexico vs England Fifa World Cup 2026 Marathi Football News: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील मेक्सिको विरुद्ध इंग्लंड सामना कमालीचा नाट्यमय ठरला. घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर मेक्सिकोने इंग्लंडवर सर्वतोपरी दडपण आणले होते, परंतु ते झुगारून थ्री लायन्सने सामन्यात आघाडी घेतली. फुटबॉलचा खरा थरार काय असतो ते या सामन्यातून अनुभवायला मिळाले. ५४ व्या मिनिटानंतर १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत मेक्सिकोला घरात घुसून पराभूत केले.