Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Maharashtra Judoka Glasgow: छत्रपती संभाजीनगरमधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या या लेकीने आपल्या कष्ट, जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे.
Judoka Shraddha Chopde

Judoka Shraddha Chopde

esakal

Updated on

अहिल्यानगरः एका मागोमाग एक धक्के बसलेल्या भारतीय ज्युदो संघातही एक चेहरा मात्र शांत, संयमी आणि आत्मविश्‍वासाने उजळून निघाला. तो म्हणजे महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय ज्युदोपटू श्रद्धा चोपडे. डोपिंग प्रकरणामुळे संघातील दोन पदकांचे दावेदार खेळाडू स्पर्धेबाहेर गेले, वातावरण निराशेचे झाले; पण श्रद्धाने त्या वादळाचा स्वतःवर कणभरही परिणाम होऊ दिला नाही. अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक यशपाल सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अधिक जोमाने सराव केला आणि आज ती आपल्या स्वप्नांची शिदोरी घेऊन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ग्लासगोच्या (स्कॉटलंड) दिशेने रवाना झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com