Junior Hockey World Cup Begins Today
esakal
ज्युनियर विश्वकरंडक हॉकी स्पर्धा आजपासून सुरु होत असून भारतीय संघ नऊ वर्षांनतर पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. भारताचा सलामीचा सामना उद्या चिलीविरुद्ध होणार आहे. भारताने या स्पर्धेत दोनदा विजेतेपद मिळवलेले आहे. २०१६ मध्ये लखनऊमध्ये अजिंक्य ठरताना हरेंद्र सिंग हे प्रशिक्षक होते.
हरेंद्र सिंग सध्या भारताच्या सिनियर महिला संघाचे मार्गदर्शक आहेत. भारताचा ब गटात समावेश असून चिली, ओमान आणि स्वित्झर्लंड हे इतर संघ आहेत. पाकिस्तानने भारतातील या स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी ओमानला संधी देण्यात आली आहे.