India Defeats Argentina Video : चक दे इंडिया..! भारताने संपवला नऊ वर्षांचा पदकाचा दुष्काळ ; ११ मिनिटांत चार गोल अन् अर्जेंटिना पराभूत

FIH Men's Junior World Cup 2025 : एका क्लिकवर बघा संपूर्ण मॅचचा थरार; या स्पर्धेच्या इतिहासात भारताने तिसरे स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Junior Hockey World Cup victory as India defeats Argentina to end a nine-year medal drought. India vs Argentina highlights included.

Junior Hockey World Cup victory as India defeats Argentina to end a nine-year medal drought. India vs Argentina highlights included.

esakal

Updated on

Junior Hockey World Cup India vs Argentina : ज्युनियर हॉकी विश्वचषकात चेन्नई येथे आज (बुधवार) झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या प्लेऑफमध्ये भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत अर्जेंटिनाला पराभूत केलं आणि याचबरोबर ज्युनियर हॉकी विश्वचषकातील पदकाचा आपला नऊ वर्षांचा दुष्काळ संपवला.

खरंतर सुरुवातीस भारतीय हॉकी संघ दोन गोलने पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त खेळ करत जोरदार मुसंडी मारत रोमांचकरित्या पुनरागमन केले आणि अर्जेंटिनाचा ४-२ असा पराभव केला. याआधी भारताने नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्ये लखनऊ येथे अखेरचे पदक जिंकले होते.

आजच्या सामन्यात भारतीय संघाने चौथ्या क्वार्टरमध्ये शानदार कामगिरी करत अर्जेंटिनाला पिछाडीवर टाकले. भारताकडून अंकित पाल, मनमीत सिंग, श्रद्धा नंद तिवारी आणि अनमोल एक्का यांनी गोल केले.  या विजायसह भारताने या विश्वचषकातील कांस्यपदक जिंकले आहे.

Junior Hockey World Cup victory as India defeats Argentina to end a nine-year medal drought. India vs Argentina highlights included.
Hardik Pandya Sixes Video : हार्दिकने 'राउडी' स्टाइलमध्ये एकाच षटकात ठोकलेले दोन कडक ‘सिक्स’ पाहून ‘BCCI’पण प्रचंड खूश म्हटले...

या स्पर्धेच्या इतिहासात भारताने तिसरे स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने सुरुवातीलाच चार पेनल्टी कॉर्नर गमावले. तथापि, शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने अनपेक्षित कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com