गोल्डन ग्रांप्री स्पर्धेत जस्टिन गॅटलिन विजेता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

कावासाकी (जपान) - अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिन याने रविवारी गोल्डन ग्रॅंड प्रिक्‍स स्पर्धेत शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा किताब मिळविला. त्याने १०.२८ सेकंद अशी सरस वेळ दिली. 

कावासाकी (जपान) - अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिन याने रविवारी गोल्डन ग्रॅंड प्रिक्‍स स्पर्धेत शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा किताब मिळविला. त्याने १०.२८ सेकंद अशी सरस वेळ दिली. 

अंतिम शर्यतीत गॅटलिनला जपानच्या धावपटूंकडून तगडे आव्हान मिळाले. त्याने जपानच्या असाका केंब्रिज याला केवळ शतांश तीन सेकंदाने मागे टाकले. स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत कॅनडाच्या ॲरॉन ब्राऊन याने २०.६२ सेकंद वेळ देत बाजी मारली. महिलांची शंभर मीटर शर्यत बल्गेरियाच्या इव्हेट लालोवा कॉलिओ हिने जिंकली. तिने ११.४० सेकंद वेळ देताना अमेरिकेच्या तवाना मिडोज हिला शतांश चार सेकंदाने मागे टाकले. ब्राँझपदक विजेता तिआना बाटोलेटा हिने लांब उडीतील जगज्जेतेपदाला साजेशी कामगिरी करताना ६.७९ मीटरच्या उडीसह सुवर्णपदक जिंकले.

Web Title: Justin Gatlin winner in the Golden Grand Prix tournament

टॅग्स