कॉमेंटरी बॉक्समध्ये बसलेला लँगर वेळीच धावला म्हणून पॉटिंग... | Ricky Ponting Hospitalized Justin Langer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Justin Langer

Ricky Ponting Justin Langer : कॉमेंटरी बॉक्समध्ये बसलेला लँगर वेळीच धावला म्हणून पॉटिंग...

Ricky Ponting Hospitalized : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॉमेंटरी बॉक्समध्ये एक घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची समालोचन करत असतानाच तब्येत बिघडली. त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला ह्रदय विकाराचा त्रास होऊ लागला होता. दरम्यान, यावेळी कॉमेंटरी बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या जस्टीन लँगरने वेळेचा भान राखत त्वरित हालचाली केल्याने रिकी पॉटिंगला वेळेत उपचार मिळाले.

न्यूजकॉप्टने दिलेल्या वृत्तानुसार कॉमेंटरी बॉक्समध्ये पॉटिंग बरोबरच जस्टीन लँगर आणि मॅथ्यू हेडन देखील उपस्थित होते. ज्यावेळी पॉटिंगला अस्वस्थ वाटू लागले त्यावेळी जस्टीन लँगर त्याच्याजवळ धावला. त्याने स्टेडियममधील लिफ्टमधून पॉटिंगला खाली ऑस्ट्रेलिया संघाचे डॉक्टर गोल्डिंग यांच्याकडे नेले. ज्यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासले त्यावेळी त्यांनी पॉटिंगला रूग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी पॉटिंगसोबत डॉक्टर गोल्डिंग आणि जस्टीन लँगर देखील होता. पॉटिंगला चक्कर येत होती. रूग्णालयात त्याच्या ह्रदयासंबंधीच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. पॉटिंगच्या प्रकृतीविषयी बोलायचे झाले तर ही घटना पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेक होण्याच्या आधी काही वेळ घडली.

पॉटिंग कॉमेंटरीबरोबरच सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कोचची भुमिका देखील बजावत आहे. तो 2018 पासून दिल्ली कॅपिटल्सचा कोच आहे. यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि कोच असताना आयपीएल जिंकून दाखवली आहे. 2013 मध्ये मुंबईने पॉटिंगच्या नेतृत्वाखाली आयपीएल जिंकली होती. त्यानंतर 2015 मध्ये तो कोच असताना मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....