Jyothi Vennam : ज्योती वेन्नम हिची सुवर्णपदकांची हैट्रिक ; कंपाउंड प्रकारात महिला-पुरुष विजेते

भारताची तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम हिने कमाल केली. एकाच स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळवण्याचे ऐतिहासिक यश मिळवले. त्यामुळे भारतीय महिलांनी तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत कंपाउंड प्रकारात विजेतेपद मिळवले.
Jyothi Vennam
Jyothi Vennamsakal

शांघाय : भारताची तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम हिने कमाल केली. एकाच स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळवण्याचे ऐतिहासिक यश मिळवले. त्यामुळे भारतीय महिलांनी तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत कंपाउंड प्रकारात विजेतेपद मिळवले. ज्योतीने वैयक्तिक कंपाउंड प्रकारात मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिचा १४६(९*)-१४६(९) असा पराभव करून या विश्वकरंडक स्पर्धेत आपले तिसरे सुवर्ण जिंकले. त्याअगोदर तिने कंपाउंड मिश्र आणि महिला कंपाउंड प्रकारातही सुवर्णपदक मिळवले होते.

एकाच विश्वकरंडक स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली. अशी कामगिरी दीपिका कुमारीने २०२१ मध्ये केली होती. सारा लोपेझ (२०१६) आणि साराह सोनिचसेन (२०१७) या परदेशी महिलांनीही अशीच कामगिरी केलेली आहे. या यशासह ज्योती ताक्सेला येथे होणाऱ्या विश्वकरंडक तिरंदाजी अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. सकाळच्या सत्रात झालेल्या कंपाउंड विभागात भारतीयांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित करताना पुरुष सांघिक, महिला सांघिक आणि मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदके मिळवली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली ज्योती यापैकी दोन प्रकारांत सहभागी झाली होती.

Jyothi Vennam
GT vs RCB IPL 2024 : बंगळूर-गुजरात सामन्यात कोणाची सरशी होणार?

महिलांच्या सांघिक अंतिम फेरीत ज्योती, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी इटलीचा २३६-२२५ असा पराभव करताना केवळ चारच गुण गमावले; तर पुरुषांच्या सुवर्णपदकाच्या लढतीत अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश यांनी नेदरलँडच्या संघावर मात करताना अवघे दोन गुण गमावले. त्यांनी ही लढत २३८-२३१ अशी जिंकली. मिश्र प्रकारात ज्योती आणि वर्मा यांनी प्रतिस्पर्धी लिसेल जातमा आणि रॉबिन जातमा यांचे कडवे आव्हान १५८-१५७ असे मोडून काढले.

महिलांच्या सांघिक अंतिम फेरीत ज्योती, आदिती आणि परनीत यांच्याकडून परफेक्ट १० ची अचूकता केवळ दोनदा हुकली; परंतु त्यांनी १७८-१७१ अशी मोठी आघाडी घेत मार्सेला तोनिओली, इरेन्स फ्रँचिनी आणि इलिसा रोनर यांना मागे टाकले. भारतीय पुरुष संघ चौथे मानांकित होता, पण नेदरलँडसच्या प्रतिस्पर्ध्यांवर त्यांनी आपली हुकूमत सिद्ध केली.

त्यांनी पहिल्याच फेरीत ६० गुणांची कमाई करताना केवळ दोन गुण गमावले होते. त्यानंतरही त्यांनी ६० गुणांची वसुली केली. दुपारच्या सत्रात झालेल्या वैयक्तिक प्रकारात ज्योती सुरुवातीला काहीशी मागे पडली होती. अँड्रिया हिने ८८-८७ अशी आघाडी घेतली होती, पण त्यानंतर ज्योतीने तीनदा फरफेक्ट १० ची कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com