
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरुवार पासून सिडनीच्या मैदानावर खेळण्यात येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरुवार पासून सिडनीच्या मैदानावर खेळण्यात येणार आहे. तर मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघावर आठ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाशी 1 - 1 अशी बरोबरी साधली आहे. मात्र तिसरा सामना सुरु होण्याअगोदरच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय संघाचा विकेटकिपर फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.
क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना सिडनीच्या एमसीजी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी नेट मध्ये सराव करताना फुल फॉर्म मध्ये असलेल्या केएल राहुलला दुखापत झाली असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली आहे. नेट मध्ये फलंदाजी करताना केएल राहुलच्या उजव्या हाताला दुखापत झाली असल्यामुळे तो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला असल्याचे बीसीसीआयने आज सांगितले. तसेच तो आगामी दोन सामने पार पडण्यापूर्वीच भारतात परतणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
केएल राहुल यापूर्वीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेयिंग इलेव्हनचा भाग नव्हता. मात्र आगामी दोन सामन्यांमध्ये त्याला मैदानावर उतरण्याची संधी मिळण्याअगोदरच दुखापतीमुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा मोठा झटका असणार आहे. कारण सामन्याच्या वेळेस कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास टीम इंडियाकडे आता कमी पर्यायी खेळाडू असणार आहेत.
UPDATE: KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy.
More details https://t.co/G5KLPDLnrv pic.twitter.com/S5z5G3QC2L
— BCCI (@BCCI) January 5, 2021
दरम्यान, ऑस्ट्रेलिया सोबतच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेमध्ये केएल राहुलने चांगली खेळी केली होती. तर आता तो आगामी दोन सामन्यांच्या वेळेस भारतीय संघासोबत नसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला डे नाईट सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. यानंतर दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. आणि आता तिसरा सामना येत्या गुरुवारपासून खेळवण्यात येणार आहे. व शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.