
अहिल्यानगर येथे यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. मात्र रविवारी या स्पर्धेत मोठा गोंधळ या स्पर्धेत झाला, ज्याबद्दल सध्या जोरदार चर्चा होत असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
उपांत्य सामना डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. त्यांच्यातील लढतीनंतर पंचांनी पृथ्वीराजच्या बाजूने निकाल दिला, जो शिवराजला मान्य झाला नाही.
त्याने त्यावर नाराजी व्यक्त करत रागाच्या भरात पंचांना लाथ मारल्याचे दिसले. त्याने व्हिडिओ पाहून रिव्ह्यू घ्या अशी मागणी केली असल्याचे त्याने सांगितले होते. हे प्रकरण बरेच तापले होते. त्यानंतर पोलिसांनी शिवराजला बाहेर नेले.