Babar Azam | सांगत होतो आधी विराटच्या स्तरावर पोहोच मग कॅप्टन्सी कर : कामरान अकमल

Kamran Akmal Says He Advice Babar Azam
Kamran Akmal Says He Advice Babar Azamesakal

Babar Azam Kamran Akmal : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोनवेळा भिडले. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर सुपर 4 मध्ये पाकिस्तानने भारताला मात दिली. मात्र संपूर्ण आशिया कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बॅट तशी शांतच राहिली. आता टी 20 वर्ल्डकपच्या तोंडावर पाकिस्तानच्या बॅटिंगचा बॅकबोन बाबर आझम धावांच्या दुष्काळातून जाऊ लागल्याने पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू चिंतेत आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने देखील अशीच चिंता व्यक्त केली.

Kamran Akmal Says He Advice Babar Azam
IPL 2023 : पंजाब किंग्जने अनिल कुंबळेला दिला नारळ; नव्या हंगामात बायलिस असणार हेड कोच

स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना कामरान अकमलने बाबर आझमला दिलेल्या सल्ल्याची आठवण करून दिली. अकमल म्हणाला की, 'फैसलाबाद येथील टी 20 सामन्यावेळी बाबर आझम नाणेफेकीसाठी आला होता. त्यावेळी मला कळाले की बाबर आझमला कर्णधार केलं आहे. मी त्यावेळी त्याला म्हणालो होते की, तू कर्णधार होण्याची आता ही योग्य वेळ नाहीये. तू येत्या दोन तीन वर्षात तुझी सर्वोत्तम कामगिरी कर. संपूर्ण फलंदाजी तुझ्यावर अवलंबून आहे.'

अकमल पुढे म्हणाला की, 'आधी विराट कोहली (Virat Kohli), स्टीव्ह स्मिथच्या स्तरावर पोहोच, 35 - 40 शतके ठोक आणि मग कर्णधारपदाचा आनंद घे. ज्यावेळी सर्फराज बाहेर पडेल त्यावेळी तू पुढचा कर्णधार असशील. मी त्याला आधीच सांगितलं होतं मात्र हा त्याचा निर्णय आहे. जे त्याच्या जवळ आहेत त्यांनी त्याच्याशी बोललं पाहिजे.'

Kamran Akmal Says He Advice Babar Azam
VIDEO : विराटला पाहून अनुष्काच्या 'चकडा एक्सप्रेस'मधील को-स्टारने असं काही केलं...

बाबरवर कर्णधारपदाचा अतिरिक्त ताण आता जाणवत आहे. मात्र आता त्याला काढण्याचा प्रयत्न केला तर ती संघ व्यवस्थापनाची मोठी चूक ठरू शकते असे अकमल म्हणाला. तो सांगत होता की 'मी त्याला फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. तो धावा करत होता आणि त्याने ते पुढंही करणं सुरू ठेवायला हवं होतं.'

अकमल पुढे म्हणाला 'त्याचा फ्लो चांगला होता. लोकांना त्याला बॅटिंग करताना पाहून आनंद होत होता. मात्र कर्णधारपदामुळे त्याच्यावर नक्कीच दबाव असणार आहे. त्याचा त्याच्या बॅटिंगवर परिणाम होत आहे. आता तो दिसतही आहे. मात्र आता त्याला कर्णधारपदावरून दूर करणे ही संघ व्यवस्थापनाची मोठी चूक ठरू शकते. पाकिस्तान क्रिकेट मागे पडू शकतं'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com