World Cup 2019 : विल्यमसनने मोडला गुप्टीलचा उच्चांक

Kane Williamson
Kane Williamson

भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात 67 धावांची खेळी करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने एक उच्चांक पार केला. तो न्यूझीलंडतर्फे एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याच्या 548 धावा झाल्या.

आधीचा उच्चांक सलामीवीर मार्टिन गुप्टील याने मागील स्पर्धेत नोंदविला होता. गुप्टीलने 2015च्या स्पर्धेत 9 सामन्यांत 547 धावा केल्या होत्या. विल्यमसन हा एका वर्ल्ड कपमध्ये पाचशेपेक्षा जास्त धावा करणारा दुसराच किवी फलंदाज बनला. 

किवींतर्फे मार्टिन क्रो याने 1992च्या स्पर्धेत 456 धावा केल्या होत्या. त्याचाचा उच्चांक 2007च्या स्पर्धेत स्कॉट स्टायरीस याने मोडला होता. स्टायरीसने 499 धावा केल्या होत्या. 

विल्यमसनची या वर्ल्ड कपमधील कामगिरी : 
एकूण सामने
डाव 8 
नाबाद
धावा 548 
चेंडू 718 
सर्वोच्च 148 
सरासरी 91.33 
स्ट्राईक रेट 76.32 
शतके 2 
अर्धशतके
शून्य 0 
चौकार 48 
षटकार 3 

प्रत्येक सामन्यातील कामगिरी : 

  • विरुद्ध श्रीलंका ः फलंदाजीची संधी नाही 
  • विरुद्ध बांगलादेश 40 
  • विरुद्ध अफगाणिस्तान 79 नाबाद 
  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका 106 नाबाद 
  • विरुद्ध वेस्ट इंडिज 148 
  • विरुद्ध पाकिस्तान 41 
  • विरुद्ध ऑस्ट्रेलिया 40 
  • विरुद्ध इंग्लंड 27 
  • विरुद्ध भारत 67

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com