esakal | पंतला कपिल देवचा मोलाचा सल्ला, रोहितसोबत केली तुलना
sakal

बोलून बातमी शोधा

file

पंतला कपिल देवचा मोलाचा सल्ला, रोहितसोबत केली तुलना

sakal_logo
By
नामदेव कुंभार

IND vs NZ, WTC Final 2021 : माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल यांनी युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) याची तुलना रोहित शर्मासोबत केली आहे. यासोबतच कपिल देव यांनी पंतला मोलाचा सल्ला दिला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान 18 जून रोजी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (ICC WTC Final 2021) होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. 18 जून ते 22 जून दरम्यान कसोटीचा बॉस कोण? हे ठरणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी भारताचा माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या रोखठोख वक्तव्यामुळे 61 वर्षीय कपिल देव नेहमीच चर्चेत असतात. पंतबद्दल कपिल देव यांनी मन की बात करत मोलाचा सल्ला दिला आहे. नुकत्याच्या झालेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंत विजयाचा सूत्रधार ठरला होता. (kapil dev gave special advice to rishabh pant before england tour compared to rohit sharma)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून ऋषभ पंत दमदार फॉर्ममध्ये आहे. ब्रिस्बेन येथे झालेल्या सामन्यात तुफानी 89 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. तुफानी फटकेबाजी करणाऱ्या पंतने थोडी संथ आणि संयमी फलंदाजी करावी असा सल्ला कपिल देव यांनी दिला आहे. ऋषभ पंतला फलंदाजीत आक्रमकतेबरोबरच संयमी ठेवण्याची गरज असल्यचं कपिल देव यांनी सांगितलं. संयमानं फलंदाजी केल्यास जास्तीत जास्त वेळ मैदानार राहाता येईल. याचाच फायदा भारतीय संघाला होईल, असं कपिल यांनी सांगितलं.

हेही वाचा: WTC final कपिल देवचं मोठं वक्तव्य

फलंदाजीच्या शैलीवरुन ऋषभ पंतची तुलना कपिल देव यांनी रोहित शर्मा याच्यासोबत केली आहे. मिड डे या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव म्हणाले की, ''भारतीय संघात आल्यानंतर ऋषभ पंत आणखी परिपक्व क्रिकटपटू झाला आहे. फटके मारण्यासाठी पंतकडे इतर खेळाडूंपेक्षा जास्त वेळ आहे. पंतने आपल्या विस्फोटक फलंदाजीने अनेकदा भारतीय संघाला विजयासमिप नेहलं आहे. पण इंग्लंडमधील खेळपट्टी आणि वातारण अतिशय आव्हानात्मक असेल. त्यामुळे खेळपट्टीवर जास्तीत थांबावं लागेल.''

हेही वाचा: WTC Final : 'रोहित-विराट नव्हे पंतची भिती वाटतेय'

साउथैम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंडचा संघ भिडणार आहेत. विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथैम्प्टन ऐवजी लॉर्ड्स अथवा ट्रॅफर्ड येथे पाहायला आवडलं असते, असं कपिल देव म्हणाले. दरम्यान, लॉर्ड्सवर विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार होता. मात्र, तो शिफ्ट करण्यात आला. कोरोनाचं कारण देत सामना शिफ्ट करण्यात आला. कोरोना महामारीमुळे कठोर नियम बनवण्यात आले आहेत. महत्वाच्या खिताबासाठी एकापेक्षा जास्त सामने खेळणं कधीही चांगलं. सध्याच्या घडीला कोणत्याही सामन्यासाठी तयारी करणं काही मोठी गोष्ट नाही. एकापेक्षा जास्त सामने असते तर दोन्ही संघाना समान संधी मिळाली असती. कसोटी क्रिकेट सत्रांचा खेळ आहे. जास्तित जास्त सत्रे जो संघ आपल्या नावावर करेल तो विजय मिळवेल. तसेच इंग्लंडमधील परिस्थितीही महत्वाची आहे. इंग्लंडमध्ये फलंदाजीत तंत्र महत्वाची भूमिका बजावते. भारताची फलंदाजी मजबूत आहे. मात्र, सध्याच्या घडीला गोलंदाजीही दर्जेदार होत आहे.