ठरलं! कपिल देवच निवडणार नवा कोच

Kapil Dev led Cricket Advisory Committee to pick Indias new coach
Kapil Dev led Cricket Advisory Committee to pick Indias new coach

नली दिल्ली : टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी कपिलदेव यांच्या हंगामी समितीकडे देण्यात आली आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी ऑगस्ट महिन्यात मुलाखती घेण्यात येतील. आज दिल्लीमध्ये झालेल्या सभेनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

कपिल देव यांच्या हंगामी समितीत अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. ''भारतीय संघाच्या प्रशिक्षकांची निवड हे तिघं करतील, ही समिती फक्त याच कामासाठी निवडण्यात आलेली नाही त्यामुळे येथे हितसंबंधांची काहीही गल्लत होणार नाही. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्यांच्या मुलाखती ऑगस्टमध्ये घेण्यात येतील,'' असे प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले. 

भारतीय संघाच्या व्यवस्थापनासाठी खालील सात जागांची नियुक्ती होणार आहे. 

1) मुख्य प्रशिक्षक

2) फलंदाजीचे प्रशिक्षक

3) गोलंदाजी प्रशिक्षक

4) क्षेत्ररक्षक प्रशिक्षक

5) फिजिओथेरपिस्ट

6) स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक

7) प्रशासकीय व्यवस्थापक
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com