Kapil Dev on India’s Recent Losses
esakal
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाचं प्रदर्शन अंत्यत सुमार दर्जाचं राहिलं आहे. भारताला अनेक कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय टी-२० मालिकेतही पराभवाची चव चाखावी लागली आहेत. भारतीय संघाच्या कामगिरीनंतर कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच कसोटी आणि टी-२० साठी वेगळे प्रशिक्षक असावेत का? अशी चर्चाही क्रिकेटवर्तुळात सुरु आहे. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भारताला १९८३ चा विश्वचषक जिंकूण देणारे कर्णधार कपिलदेव यांनी प्रतिक्रिया दिला आहे.