Kapil Dev : टीम इंडियासुद्धा नवे चोकर्स ? वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कप्तानची घणाघाती टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil Dev

Kapil Dev : टीम इंडियासुद्धा नवे चोकर्स ? वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कप्तानची घणाघाती टीका

Kapil Dev Says Team India Chokers : टीम इंडियाला टी-20 विश्वचषक-2022 जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर संघाला बाहेर पडावे लागेल, असे कोणालाही वाटले नव्हते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावून उपांत्य फेरीत धडक मारली होती, पण 15 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये पुन्हा चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता भारताचे माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांनी या संघाला 'चोकर्स' म्हटले आहे.

हेही वाचा : हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी आता टीम इंडियाला 'चोकर्स' म्हटले आहे. गेल्या सहा विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरीत पराभूत होऊन पाचव्यांदा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कपिल यांनी सांगितले की, मी फार कडक शब्दात टीका करणार नाही कारण हे तेच खेळाडू आहेत. ज्यांनी आम्हाला भूतकाळात सेलिब्रेट करण्याची संधी दिली आहे. पण होय, आम्ही त्यांना 'चोकर' म्हणू शकतो. एवढ्या जवळ आल्यानंतर पुन्हा पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागत आहे, हे नाकारून चालणार नाही.

हेही वाचा: Sania Mirza-Shoaib Malik : 'या' एका कारणामुळे सानिया-शोएबचा घटस्फोट लांबतोय, चर्चांना उधाण

भारताने शेवटची आयसीसी स्पर्धा 2013 मध्ये जिंकली होती, तेव्हा त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर टीम इंडिया 2014 टी-20 विश्वचषक (फायनल), 2015 एकदिवसीय विश्वचषक (सेमी-फायनल), 2016 टी-20 विश्वचषक (सेमी-फायनल), 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी (फायनल), 2019 एकदिवसीय विश्वचषक (सेमी-फायनल) यासह 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2022 टी-20 वर्ल्ड कप (उपांत्य फेरी) फायनलमध्ये देखील संघाचा पराभव झाला आहे.

हेही वाचा: Team India T20 WC : उपांत्य फेरीत पराभूत होऊनही टीम इंडिया मालामाल, मिळणार इतके कोटी

अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने 6 गडी गमावत 168 धावा केल्या. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार विराट कोहलीने अर्धशतके झळकावली. हार्दिकने 33 चेंडूत 63 तर विराटने 40 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. यानंतर इंग्लंडने 16 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. कर्णधार जोस बटलर 80 आणि अॅलेक्स हेल्सने 86 धावा करून नाबाद माघारी परतला.