स्पर्धा सुरू असतानाच महिला स्विमरला आली चक्कर; बुडत असताना....

US swimmer Anita Alvarez fainted sinking to bottom rescued By Coach
US swimmer Anita Alvarez fainted sinking to bottom rescued By Coach esakal

बुडापेस्ट : जागतिक अॅक्वेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बुधवारी अमेरिकेची महिला स्विमर अनिता अल्वारेझला स्पर्धा सुरू असतानाच चक्कर आली. त्यामुळे ती स्विमिंग पूलच्या तळात पोहचली होती. मात्र ती बुडत असतानाच तिला वाचवण्यात आले. प्रशिक्षक अँड्रेआ फ्युइन्टस यांनी या 25 वर्षीय स्विमरचा जीव वाचवला. (US swimmer Anita Alvarez fainted sinking to bottom rescued By Coach)

US swimmer Anita Alvarez fainted sinking to bottom rescued By Coach
Afghanistan Earthquake: सर्व काही गमावलेल्यांसाठी राशिद खानची भावनिक पोस्ट

ज्यावेळी अल्वारेझला स्विमिंगपूलमधून बाहरे आणण्यात आले त्यावेळी तिचा श्वास सुरू नव्हता. कोट फ्युइन्टस यांनी बेशुद्ध पडलेल्या अल्वारेझला वर आणले त्यावेळी तिला पूलमधून बाहेर काढण्यासाठी मदतीची गरज भासली. त्यानंतर तिला स्ट्रेचरवरून स्विमिंग पूलच्या मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. या सर्व घटनेमुळे संघ आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

यानंतर काही वेळाने अमेरिकेच्या स्विमिंग टीमने एक वक्तव्य प्रसिद्ध करत अल्वारेझ ठीक असल्याची माहिती दिली. फ्युइन्टस यांनी नंतर मार्साला सांगितले की, 'हे खूप भितीदायक होते. लाईफगार्ड पाण्यात उतरत नाहीयेत हे पाहिल्यानंतर मी पाण्यात उडी मारली.' स्पॅनिश रेडिओला दिलेल्या मुलाखतीत कोच फ्युइन्टस यांनी सांगितले की अल्वारेझला चक्कर आली कारण तिची रुटिंनवेळी खूप दमछाक झाली. कोच फ्लुइन्टस म्हणाल्या 'तिच्या फुफ्फुसात पाणी गेलं होतं. ज्यावेळी ती पुन्हा श्वास घ्यायला लागली त्यावेळी सर्व काही व्यवस्थित झाले.'

US swimmer Anita Alvarez fainted sinking to bottom rescued By Coach
IND vs LEIC : बुमरा, पुजारा अन् पंत टीम इंडियाविरूद्धच थोपटणार दंड

त्या पुढे म्हणाला की, 'मला तासाभरापासूनच गोष्टी योग्य पद्धतीने सुरू नसल्याचे जाणवत होते. मी लाईफगार्ड यांच्यावर पाण्यात उडी मराण्यासाठी ओरडत होतो. मात्र त्यांनी मी काय म्हणतोय हे समजत नव्हते. तिचा श्वास सुरू नव्हता. मी तिच्यापर्यंत जितक्या वेगाने पोहचता येईल तितक्या वेगाने जात होता. जणू काही ही ऑलिम्पिकची फायनलच सुरू आहे.'

कोचने सांगितल्याप्रमाणे पुढील वैद्यकीय तपासणीनंतर गुरूवारी अल्वारेझ गुरूवारी विश्रांती घेऊन शुक्रवारी सांघित प्रकारात खेळणार आहे. फ्लुइन्टस यांनी सांगितले की, 'अल्वारेझ सध्या ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितले की तिची तब्येत चांगली आहे. उद्या ती पूर्ण दिवस विश्रांती घेईल त्यानंतर डॉक्टरांशी चर्चा करून ती फ्री टीम फायनलमध्ये सहभाग घेऊ शकेल की नाही याचा निर्णय घेतला जाईल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com