Ayodhya Ram Mandir : आफ्रिकेच्या केशव महाराजानं रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिल्या खास शुभेच्छा!

Keshav Maharaj Ram Mandir Pran Pratishtha
Keshav Maharaj Ram Mandir Pran Pratishthaesakal
Updated on

Keshav Maharaj Ram Mandir Pran Pratishtha : रामजन्मभूमी अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अनेक दिग्गज आणि सेलिब्रेटींना आमंत्रण देण्यात आलं आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा भारतीय वंशाचा फिरकीपटू केशव महाराजने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

Keshav Maharaj Ram Mandir Pran Pratishtha
Virat Kohli : हैदराबाद की अयोध्या...; विराट कोहली आता आहे तरी कुठे? व्हिडिओ होतोय व्हायरल

केशव महाराजने अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या लोकांकडून शुभेच्छा दिल्या. याचबरोबर त्याने सर्वांसाठी शांतता, एकोपा लाभो अशी प्रर्थना केली. त्याने आपला संदेश जय श्री राम म्हणत संपवला.'

Keshav Maharaj Ram Mandir Pran Pratishtha
Video : पठ्ठ्याने इंग्लिश गोलंदाजांना तुडव तुडव तुडवले! शतक ठोकत मैदानातून सोडला 'बाण', भरतचे जय श्रीराम

केशव महाराज ज्या ज्यावेळी मैदानावर उतरतो त्यावेळी मैदानात राम सिया-राम हे गाणं वाजतं. गेल्या कारही आठवड्यापूर्वीच केशव महाराजने यामागचं कारण पीटीआयशी बोलताना सांगितलं होतं.

तो म्हणाला की, 'नक्कीच मी त्या मुलीला सांगितलं होतं की हे गाणं वाजव. कारण देवाचा आशीर्वाद हा माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला मार्गदर्शन आणि संधी मिळते. मी त्यासाठी इतकच करू शकतो. यामुळे मला माझ्या झोनमध्ये जाण्यास मदत होते. तुम्ही मैदानावर जात असताना राम सिया-राम ऐकायला मिळणं ही खूप छान फिलिंग असते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ram Lalla Aarti Darshan Made Easy Learn Offline Pass Process and Skip Online Waiting
ayodhya ram mandir julan utsav
Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Swami Govind Dev Giri
Marathi News Esakal
www.esakal.com