Ukraine Russia crisis : केविन पीटरसनच्या कुटुंबाने घेतला पोलंडमध्ये आश्रय; सुखरूप परतले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kevin Peterson

केविन पीटरसनच्या कुटुंबाने घेतला पोलंडमध्ये आश्रय

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. भारत युक्रेनमधून नागरिकांना युद्धपातळीवर परत आणत आहे. अनेक देशांचे नागरिक अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनचे (Kevin Peterson) कुटुंबही त्यापैकीच एक आहे. जे युद्ध सुरू झाल्यापासून तिथे अडकले होते. मात्र, आता ते सुखरूप परतले आहेत. खुद्द पीटरसनने सोशल मीडियावर ही माहिती दिली. रशियन हल्ल्याच्या वेळी त्याचे कुटुंब युक्रेनमध्ये अडकले होते आणि आता सुदैवाने सुरक्षितपणे बचावले आहेत, असे तो म्हणाला.

माझे कुटुंब युक्रेनमधून (Ukraine) बाहेर पडले आहे. आम्ही पोलंडमध्ये (Poland) आश्रय घेतला आहे, असे पीटरसन म्हणाला. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर चार लाखांहून अधिक नागरिकांनी पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे. पीटरसनने (Kevin Peterson) ट्विटरवर लिहिले, 'मला एवढेच सांगायचे आहे की पोलंड हे युक्रेनियन लोकांसाठी चांगले ठिकाण आहे. माझे कुटुंबही युक्रेनची सीमा ओलांडून पोलंडमध्ये पोहोचले आहे. धन्यवाद पोलंड.'

प्रसिद्ध समालोचक पीटरसन याच्याशिवाय त्यांची पत्नी जेसिका पीटरसन (Kevin Peterson) हिनेही पोलंड सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत. जेसिकाने ट्विट केले की, पोलंडच्या (Poland) लोकांनो, तुम्ही आमच्या कुटुंबाचे केलेले स्वागत आणि दाखवलेला दयाळूपणा कधीही विसरू शकत नाही.