esakal | Euro : वर्णभेदाच्या प्रकारानंतर पीटरसननेच काढली इंग्लंडची लायकी
sakal

बोलून बातमी शोधा

Racial Abuse Of Footballers

Euro : वर्णभेदाच्या प्रकारानंतर पीटरसननेच काढली इंग्लंडची लायकी

sakal_logo
By
सुशांत जाधव

लंडन : युरो कप स्पर्धेतील फायनलनंतर इंग्लंडच्या फुटबॉल संघातील खेळाडूंना वर्णभेदाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या तीन खेळाडूंविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटलेल्या वर्णभेदी कमेंटची माजी क्रिकेटर केविन पीटरसन याने निंदा केलीये. वेम्बले स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडला पेनल्टी शूट आउटमध्ये पराभूत व्हावे लागले. त्यानंतर इंग्लंडच्या तीन कृष्णवर्णीय खेळाडूंवर आक्षेपार्ह शब्दात टीका करण्यात येत आहे. हे कृत्य चुकीचे असून आपल्या देशाला फिफा 2030 चे यजमानपद मिळण्याबाबत पीटरसनने प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. (Kevin Pietersen condemned the racial abuse of black footballers of england)

इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार पीटरसन म्हणाला की, युरो कप स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर इंग्लंडला पेनल्टी शूट आउटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. इटलीकडून पराभूत झाल्यानंतर देशातील चाहत्यांमध्ये अराकता पसरल्याचे पीटरसनने म्हटले आहे.

हेही वाचा: Euro 2020 : इंग्लंडच्या पराभवानंतर राडा घालणाऱ्या 49 जणांना अटक

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि इंग्लंड फुटबॉल महासंघानेही पेनल्टी चुकलेल्या तीन कृष्णवर्णीयांवर सोशल मीडियावर होणाऱ्या वर्णभेदी टिप्पणी अयोग्य असल्याचे म्हटले होते. रविवारी मध्यरात्री रंगलेल्या सामन्यातील फायनलमध्ये मार्कस रशफोर्डने मारलेला पेनल्टी गोल पोस्टच्या बारला आदळली. तर बुकायो साका आणि जेडन सांचो यांच्या पेनल्टी रोखून इटालियन गोलकिपरने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. नियमित आणि अतिरिक्त वेळेत सामना 1-1 बरोबरीत राहिल्यानंतर इटलीने पेनल्टी शूट आउटमध्ये 3-2 असा विजय नोंदवला.

हेही वाचा: ICC Award : स्नेह-शफाली आउट; सोफी-कॉन्वेनं मारली बाजी

पीटरसनने ट्विटमध्ये लिहिलंय की, रात्री ज्यावेळी डायलनसोबत कारमधून घरी परतत होतो त्यावेळी परिस्थिती खूपच भयावह होती. 2021 मध्ये असा काही प्रकार घडतोय याचा विश्वास बसत नाही. आपल्याला आनंद देणाऱ्या खेळाडूंबद्दल एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असेल तर आपण 2030 मध्ये वर्ल्ड कपचे यजमानपद भुषवण्याच्या लायक आहोत का? असा संतप्त सवाल पीटरसनने उपस्थितीत केलाय. युनायटेड किंगडम 2030 च्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या यजमानपदासाठी दावा करणाऱ्या देशांमध्ये आहे. मिनी वर्ल्ड कपनंतर देशातील माहोल हा आपल्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारा असल्याचे पीटरनने म्हटले आहे.

loading image