
रेल्वे अपघातात डावा पाय गमविल्यानंतरही जिद्दीने खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या दिनेश बागडेने सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. 46 वर्षीय विक्रमसिंह अधिकारीने पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. नेमबाजीत महाराष्ट्राला तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
अॅथलेटिक्स पाठोपाठ पॉवरलिफ्टिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. स्पर्धेत 2 सुवर्ण 2 रौप्य व 1 कांस्य अशी एकूण 5 पदके महाराष्ट्राने पटकावले. गत स्पर्धेत 2 रौप्य व 2 कांस्य अशी महाराष्ट्राची कामगिरी होती.