Khelo India Para Games: महाराष्ट्राचा महिलाशक्तीचा सुवर्ण पराक्रम; अकुताई, भाग्यश्री, प्रतिमा सलग दुसर्‍यांदा पदकवीर

Maharashtra Women in Khelo India Para Games: दुसर्‍या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्येही महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी दणदणीत कामगिरी केली. अ‍ॅथलेटिक्समध्ये अकुताई उनभगत, भाग्यश्री जाधव आणि पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रतिमा भोंडे यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली.
Khelo India Para Games
Khelo India Para GamesSakal
Updated on

महाराष्ट्राच्या महिलाशक्तीचा जयजयकार सलग दुसर्‍या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्येही दुमदुमला. अ‍ॅथलेटिक्समध्ये अकुताई उनभगत, भाग्यश्री जाधव आणि पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रतिमा भोंडे यांनी यंदा सुवर्णपदकासह स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा पदक जिंकण्याचा पराक्रम नोंदविला आहे.

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये संपलेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 38 वर्षीय अकुताई हिने गोळाफेकमधील एफ 40 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने 5.79 मीटर अंतरावर गोळा फेकला. याच प्रकारात महाराष्ट्राच्या रूही शिंगाडेने 4.43 मीटर फेकी करून कांस्यपदकाची कमाई केली.

Khelo India Para Games
Khelo India Para Games: आरती पाटील, सुकांत कदम सुवर्णपदकासाठी खेळणार; बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राची तीन पदके निश्चित
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com