थॉमस, उबेर स्पर्धेतून सिंधू, श्रीकांतची माघार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - थॉमस-उबेर चषक जागतिक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी किदांबी श्रीकांत, तसेच पी. व्ही. सिंधू यांना ब्रेक देण्यात आला आहे. जागतिक स्पर्धा तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी सिंधू पूर्ण तंदुरुस्त नव्हती. आशियाई स्पर्धेतही तिचा प्रभाव पडला नव्हता. त्यामुळे तिने ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. कामगिरी अपेक्षेइतकी चांगली होत नसल्यामुळे श्रीकांतने काही स्पर्धांत ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तो या स्पर्धेत खेळणार नाही.

या स्पर्धेतील पुरुष एकेरीसाठी एच. एस. प्रणॉय, बी. साई प्रणीत, समीर वर्मा आणि लक्ष्य सेनची निवड झाली आहे, तर दुहेरीसाठी मनू अत्री-सुमित रेड्डी, श्‍लोक रामचंद्रन-एम. आर. अर्जुन यांच्यासह सन्यान शुक्‍ला-अरुण जॉर्जला निवडण्यात आले आहे. महिला संघात साईना सोडल्यास उर्वरित सर्वच खेळाडू नवोदित आहेत.

साईनाला वैष्णवी जक्का रेड्डी, साई कृष्णा प्रिया, अनुरा प्रभु आणि वैष्णवी भाले या सर्व युवा खेळाडूंना बरोबर घेऊन खेळावे लागेल. भारतीय बॅडमिंटन संघात स्थान मिळविणारी अनुरा ही पहिली गोव्याची खेळाडू ठरली आहे.

Web Title: kidambi srikanth and p.v.sindhu thomas uber badminton competition