
KL Rahul Wedding: लग्नाला या पण फोन घरीचं ठेवा... राहुल-आथियाचं नवं फर्मान
KL Rahul Wedding: स्टार भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अथिया शेट्टी उद्या म्हणजेच 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या बंगल्यावर हे जोडपे एकमेकांचा हात धरणार आहेत.
राहुल आणि अथियाच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना कार्यक्रमात मोबाईल फोन आणण्याची परवानगी नाही. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो इकडे तिकडे पोस्ट केले जाणार नाहीत. लग्नाला फक्त 100 पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा: Shoaib Akhtar: 'रावळपिंडी एक्सप्रेस' आता बंद! अख्तरने निर्मात्यांना दिला इशारा
रिपोर्टनुसार, लग्नादरम्यान सर्व पाहुण्यांचे मोबाईल जप्त केले जातील. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बॉलीवूडचा कोणताही सेलिब्रिटी आणि क्रिकेटर या लग्नात सहभागी होणार नाही.
हेही वाचा: Rohit Sharma: एका फॉरमॅटला रामराम! वर्ल्ड कपनंतर रोहित घेणार मोठा निर्णय?
सोमवारी 23 जानेवारी हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. याआधी 21 जानेवारीला संगीत आणि लेडीज नाईटचा कार्यक्रम यानंतर मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. लग्नाला येणारे सर्व पाहुणे रॅडिसन हॉटेलमध्ये राहणार आहेत. लग्नानंतर, हे जोडपे एप्रिल महिन्यात एक भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहे, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सर्व क्रिकेटर्स उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा: IND vs NZ: या भारतीय संघावर शंका..., पत्रकारांना मोहम्मद शमीचे सडेतोड उत्तर
दोघांचे लग्न दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार होणार आहे. अॅमी पटेल अभिनेत्री अथिया शेट्टीला लग्नासाठी तयार करणार आहे. याशिवाय दोघांच्या लग्नाचे आउटफिट आधीच फायनल झाले आहेत. केएल राहुलच्या लग्नाचा पोशाख राहुल विजयचा असेल.