KL राहुलची लाख मोलाची मदत; वरदच्या आईनं जोडले हात; म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul

KL राहुलची लाख मोलाची मदत; वरदच्या आईनं जोडले हात; म्हणाली...

भारतीय संघाचा उप कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने 11 वर्षीय मुलाला अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी ( Bone Marrow Transplant) लाख मोलाची मदत केली आहे. मुंबईतील वरद नावाच्या मध्यम वर्गीय कुटुंबियातील मुलावरील शस्त्रक्रियेसाठी त्याने 31 लाख रुपयांची मदत केली. वरदची आई स्वप्ना यांनी लोकेश राहुलचे विशेष आभार मानले आहेत. (KL Rahul donates Rs 31 lakh for budding cricketer Vasads surgery mother Swapna said Thank You sbj86)

वरदचे वडिल सचिन नलावडे विमा कंपनीत एजंटचे काम करतात. तर आई स्वप्ना झा या गृहिणी आहेत. वरदवरील उपचारासाठी 35 लाख रुपयांची गरज होती. त्याची आई स्वप्ना यांनी डिसेंबर 2021 पासून वरदच्या उपचारासाठी Give India या संस्थेच्या माध्यमातून निधी गोळा करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी लोकेश राहुलला यासंदर्भात माहिती मिळाली त्यावेळी त्याने मदतीचा हात पुढे केला. त्याच्या टीमने Give India या संस्थेशी संपर्क साधत वरद संदर्भातील संपूर्ण माहिती घेतली. त्याने केलेल्या आर्थिक मदतीमुळे वरदच्या उपचारासाठी लागणारी आर्थिक मदत सहज शक्य झाली आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

हेही वाचा: VIDEO : शाहिन शाह आफ्रिदीची स्फोटक फलंदाजी, रिअ‍ॅक्शन व्हायरल

वरदच्या शस्त्रक्रियेसाठी एवढी मोठी रक्कम दिल्याबद्दल आम्ही केएल राहुलचे आभारी आहोत. त्याच्या मदतीशिवाय एवढी मोठी रक्कम जमा करणं शक्य झाले नसते, अशा शब्दांत वरदच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वरद हा क्रिकेटर होण्याचे स्वप्न बाळगून आहे. त्याच्या 11 व्या बर्थ डेला वडिलांनी त्याला बॅट भेट दिली होती. लोकेश राहुलने त्याला भविष्यातील वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. वरद लवकरच स्वतःच्या पायावर उभा राहून स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करेल, असे लोकेश राहुलनं म्हटले आहे. मी दिलेल्या मदतीमुळे इतरांना प्रेरणा मिळेल आणि तेही गरजूंना मदत करतील, अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: प्लॅन B नाहीये...! अनसोल्ड रैनाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Web Title: Kl Rahul Donates Rs 31 Lakh For Budding Cricketer Vasads Surgery Mother Swapna Said Thank You

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top