
VIDEO : शाहिन शाह आफ्रिदीची स्फोटक फलंदाजी, रिअॅक्शन व्हायरल
PSL 2022 : लाहोर कलंदर्सचा कर्णधार शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi i) याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. पेशावर झल्मी विरुद्धच्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी करत त्याने सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) आणि पेशावर (Peshawar Zalmi)जल्मी यांच्यात पीएसएल 2022 चा सामना रंगला होता. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. आफ्रिदीच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला असता तरी भेदक मारा करणाऱ्या या गोलंदाजने केलेल्या फटकेबाजीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
लाहोर संघाला अखेरच्या षटकात 24 धावांची गरज होती. शाहिन आफ्रिदी आणि फवाद अहमद ही जोडी क्रीजमध्ये होती. पेशावरकडून मोहम्मद उमर अखेरच षटक घेऊन आला. त्याने व्हाईड चेंडू टाकत षटकाची सुरुवात केली. त्यानंतर पहिल्या चेंडूवर आफ्रिदीनं खणखणीत चौकार मारला. त्यानंतरच्या दोन चेंडूवर आफ्रिदीनं दोन षटकार खेचत सामन्यातील रंगत वाढवली. (PSL 2022 Shaheen Afridi Back To Back sixes in final over reaction goes viral watch Video)
हेही वाचा: प्लॅन B नाहीये...! अनसोल्ड रैनाचा व्हिडिओ होतोय व्हायरल
लाहोरच्या संघाला अखेरच्या तीन चेंडूवर 7 धावांची गर होती. सामना लोहारच्या बाजूनं झुकलाय असे वाटत असताना मोहम्मद उमरनं दोन चेंडू निर्धाव टाकले. शाहिन आफ्रिदीनं अखेरच्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारून सामना चाय केला. शाहिन आफ्रिदीने अखेरच्या षटकात 22 धावा केल्या. त्याने 20 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 39 धावा कुटल्या.
हेही वाचा: 'मोठ्या खेळाडूंना मस्का लावलेलं आवडतं' व्यंकटेश प्रसादचे साहा प्रकरणावरून वक्तव्य
सुपर ओव्हरमध्ये पेशावरनं जिंकला सामना
कर्णधार आफ्रिदीच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. पण अखेर या सामन्यात बाजी मारली ती पेशावर संघानं. पेशावरकडून सुपर ओव्हरमध्ये वहाब रियाजनं घात गोलंदाजी केली. टी 20 जगातील स्टार शोएब मलिकनं दोन चौकार खेचून पेशावर संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Web Title: Psl 2022 Shaheen Afridi Back To Back Sixes In Final Over Reaction Goes Viral Watch Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..