KL Rahul : 'आधी संघातून हाकलून द्या', मोठ्या संघाविरूद्ध पुन्हा फेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 kl rahul

KL Rahul : 'आधी संघातून हाकलून द्या', मोठ्या संघाविरूद्ध पुन्हा फेल

KL Rahul T20 World Cup 2022 : भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात फ्लॉप ठरला आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंडच्या उपांत्य फेरीत राहुलकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्याने पुन्हा निराशा केली. राहुल अवघ्या 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये केएल राहुलची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या तीन सामन्यात त्याने केवळ 22 धावा केल्या. मात्र यानंतर त्याने बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध सलग दोन अर्धशतके झळकावली होते.

हेही वाचा: Virat Kohli : बादशाहत कायम! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत राहुलकडून मोठी खेळी अपेक्षित होती, मात्र तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. राहुलने इंग्लंडविरुद्धच्या या मोठ्या सामन्यात केवळ 5 धावा केल्या. राहुलच्या या खेळीमुळे चाहतेही संतापले. राहुल सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये आला आहे. त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. बहुतेक चाहत्यांनी केएल राहुलला भारतीय संघातून तत्काळ काढून टाकण्याची मागणी करत आहे.