केएल राहुलने दिली आनंदाची बातमी, आता लवकरच...

KL Rahul Give Good News To Fans Will Recover From Injury Soon
KL Rahul Give Good News To Fans Will Recover From Injury Soonesakal

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी सामना 1 जुलैपासून सुरू होत आहे. मात्र या एकमेव कसोटीपूर्वी भारतीय संघाला दुखापत आणि कोरोनाचे मोठे ग्रहण लागले. संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाल्याने तो सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याआधीच पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यालाच मुकला होता. त्याने पायावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी त्वरित जर्मनी गाठले होते.

KL Rahul Give Good News To Fans Will Recover From Injury Soon
IND vs ENG: रोहितबाबत प्रश्नचिन्ह कायम! बाहेर गेल्यावर कोण करणार सलामी?

दरम्यान, केएल राहुलने एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याने ट्विट केले की, 'सर्वांना माझा नमस्कार, गेले काही आठवडे खूप आव्हानात्मक होते. मात्र माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी आता ठीक होत आहे. तुम्ही केलेल्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. लवकरच भेटू.'

केएल राहुल भारतात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेला देखील दुखापतीमुळे मुकला होता. केएल राहुल हा सध्या भारताचा तीनही फॉरमॅटमधील एक महत्वाचा खेळाडू आहे. याचबरोबर त्याच्यावर उपकर्णधारपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राहुलच्या क्लासिक फलंदाजी सर्वांना भावते. त्याने आतापर्यंत भारताकडून 43 कसोटी 42 वनडे आणि 56 टी 20 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये तो लखनौ सुपर जायंटचे नेतृत्व देखील करतो.

KL Rahul Give Good News To Fans Will Recover From Injury Soon
बबिता फोगाट म्हणते, 'हा माझा हिंदूस्तान आहे, इथं हिंदूंचा जीव महत्वाचा'

भारत 2020-21 ला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे होते. भारतीय संघाने या मालिकेतील चार सामने झाले त्यावेळी 2 - 1 अशी आघाडी घेतली होती. मात्र संघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पाचवा कसोटी सामना स्थगित करण्यात आला होता. आता 1 जुलैला हा सामना होणार आहे. जर हा सामना भारताने जिंकला किंवा अनिर्णित ठेवला तर भारत इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com