KL राहुल-रोहितनं रचला विक्रम, पाकच्या बाबर-रिझवान जोडीशी बरोबरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul And Rohit Sharma
KL राहुल-रोहितनं रचला विक्रम, पाकच्या बाबर-रिझवान जोडीशी बरोबरी

KL राहुल-रोहितनं रचला विक्रम, पाकच्या बाबर-रिझवान जोडीशी बरोबरी

sakal_logo
By
सुशांत जाधव

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात धावांचा पाठलाग करताना रोहित-राहुल जोडीने खास विक्रम रचला. सलग पाचव्या सामन्यात त्यांनी 50 धावांची भागीदारी पूर्ण केलीये. अशी कामगिरी करणारी टीम इंडियाची ही पहिली जोडी ठरलीये. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. यात त्यांनी पाकिस्तानी सलामी जोडीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

हेही वाचा: पदार्पणाच्या सामन्यात हर्षलची हवा; टीम इंडियासमोर 154 धावांचे आव्हान

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात या दोघांनी पहिल्या 140 धावांची भागीदारी रचली होती. स्कॉटलंड विरुद्ध दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावा केल्या होत्या. नामिबिया विरुद्ध रोहित शर्मा आणि लोकेश राहुलनं 50 धावांची भागीदारी रचली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात या दोघांनी 50 धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा त्यांनी 50 + धावा केल्या. सलग पाचव्यांदा त्यांनी ही कामगिरी करुन दाखवली.

हेही वाचा: विराटपेक्षा भारी ठरतोय रोहित, दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा दिसली झलक

ही भागीदारी पुढे नेत त्यांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. हा देखील एक विक्रमच आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागादारीचा विक्रम हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीच्या नावे होता. या दोघांनी पाचवेळा शतकी भागीदारी केली आहे. 22 डावात पाकिस्तानी जोडीनं ही कामगिरी केली होती. रोहित आणि राहुलने 27 व्या डावात त्यांच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील आणि केन विल्यमसन जोडी तिसऱ्या स्थानावर आहे. या जोडीने 30 डावात 4 वेळा शतकी भागीदारी केली असून रोहितने शिखरसोबत 52 डावात 4 वेळा शतकी भागीदारी रचली आहे.

loading image
go to top