
कसोटी कॅप्टन्सी बाबत राहुल नाही नाही म्हणत बोललाच
पार्ल : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका बुधवार ( दि. 19 ) पासून सुरु होत आहे. रोहित शर्मा दुखापतीतून सावरला नसल्याने भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे (KL Rahul) सोपवण्यात आले आहे. दरम्यान, कसोटी मालिका संपल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे कसोटीचे नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहे. जोहान्सबर्ग कसोटीत भारताचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे केएल राहुलही कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. कसोटी कर्णधारपदाबाबत केएल राहुलने प्रतिक्रिया दिली. (KL Rahul Statement About Test Captaincy)
हेही वाचा: Video: पोलिसांनी पोस्ट अॅशेस पार्टी केली बंद
राहुल म्हणाला, 'मी याच्यावर जोपर्यंत नाव बाहेर येत नाही तोपर्यंत कोणतीही माहिती देणार नाही. नक्कीच मला जोहान्सबर्गमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. नेतृत्व करणे खूप खास आहे. निकाल आमच्या बाजूने लागला नाही. मात्र हा एक चांगला अनुभव होता.'
राहुल (Lokesh Rahul) पुढे म्हणाला, 'देशाचे नेतृत्व करणे ही कोणासाठीही खास बाब असते. मी काही वेगळा नाही. जर जबाबदारी मिळाली तर ती नक्कीच खूप मोठी असेल. ते रोमांचकही असेल. पण, मी याचा विचार करत नाही आहे किंवा अशी अपेक्षाही करत नाही आहे. मी सध्या फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रीत केले आहे.'
हेही वाचा: मोहम्मद सिराजची विराटबद्दल भावून पोस्ट
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारत 19 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधार असेल. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली विराट कोहली पहिल्यांदाच खेळणार आहे.
3 एकदिवसीय सामन्यासाठीचा भारतीय संघ :
केएल राहुल, जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, यझुवेंद्र चहल, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी
Web Title: Kl Rahul Statement About Test Captaincy Says Focusing On The Present
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..