
मोहम्मद सिराजची विराटबद्दल भावून पोस्ट
भारताचा आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2 - 1 असा पराभव झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाचे नेतृत्व सोडत असल्याची पोस्ट केली आणि क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली. विराट कोहलीने टी 20 वर्ल्डकपनंतर टी 20 संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) एकदिवसीय संघाचे नेतृत्व विराटकडून काढून घेत रोहित शर्माकडे दिले. त्यामुळे विराट कोहली फक्त कसोटीचा कर्णधार (Test Captaincy) होता. मात्र त्याने तेही सोडण्याचा निर्णय घेतला. (Mohammed Siraj Instagram post for virat kohli)
हेही वाचा: पांड्या अहमदाबादचा कॅप्टन हा तर मोठा जुगार : आकाश चोप्रा
विराटच्या या निर्णयानंतर क्रिकेट वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) देखील आपल्या लाडक्या कर्णधारासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली.
हेही वाचा: आफ्रिदी फिव्हर! PCB ने वयाच्या घोटाळ्यावरुन स्पर्धा केल्या स्थगित
मोहम्मद सिराज आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये (Mohammed Siraj Instagram Post) म्हणतो की, 'माझ्या सुपरहिरोसाठी, तुझ्याकडून मला मिळालेला पाठिंबा आणि प्रोत्साहन याबद्दल मी जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तू माझा कायम मोठा भाऊ म्हणून राहशील. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार. माझ्या अडचणीच्या काळातही तू माझ्यातील गुणवत्ता पाहिलीस. तू माझ्यासाठी कायम कॅप्टन किंग कोहली असशील.'
हेही वाचा: तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग?
मोहम्मद सिराजला भारतीय संघात संधी देण्यात विराट कोहलीचा मोठा वाटा होता. विराट कोहली कायमच वेगवान गोलंदाजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे.
Web Title: Mohammed Siraj Instagram Post For Virat Kohli Says You Will Be Always Be My Captain King Kohli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..