
Video: पोलिसांनी पोस्ट अॅशेस पार्टी केली बंद
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेची (Ashes Series) हॉबर्ट कसोटीने सांगता झाली. या कसोटीनंतर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) संघासाठी पोस्ट अॅशेस पार्टी (Post Ashes Party) ठेवण्यात आली होती. या पार्टीत काही खेळाडू बीअरचा आस्वाद घेत गाणे म्हणत होते. दरम्यान, पोलीस पार्टीत दाखल झाले आणि त्यांनी पार्टी बंद पाडली. (Tasmania Police shut down Post Ashes Party)
हेही वाचा: मोहम्मद सिराजची विराटबद्दल भावून पोस्ट
पोलिसांना सकाळी सहाच्या दरम्यान टेरेसवर गाण्याचा मोठा आवाज होत असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर काही पोलीस कर्मचारी टेरेसवर दाखल झाले. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अॅलेक्स कॅरी (Alex Carey), ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि नॅथन लायन (Nathan Lyon) काही इंग्लंडच्या खेळाडूंबरोबर दिसत आहेत. या व्हिडिओत काही पोलीस अधिकारी देखील आहेत.
हेही वाचा: पांड्या अहमदाबादचा कॅप्टन हा तर मोठा जुगार : आकाश चोप्रा
पोलिसांकडून या खेळाडूंना टेरेसवरील संगीत बंद करुन हॉटेल रुममध्ये जाण्यास सांगण्यात आले. अॅलेक्स कॅरी आणि नॅथन लायन हे दोन्ही खेळाडू मैदानावरील कपड्यातच वावरत होते. यावरून ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकल्या जिंकल्या ही पार्टी सुरु झाली होती असे दिसते. पोलीस या खेळाडूंना म्हणत होते की, 'तुम्ही खूप आवाज करत आहात. तुम्हाला पॅक अप करायला सांगितले आहे. हे सांगायलाच आम्ही इथे आलो आहोत. टाईम टू बेड आभारी आहे.'
हेही वाचा: धोतर - कुर्ता घालून क्रिकेट, संस्कृतमध्ये कॉमेंटरी
याबाबतची बातमी द एज अँड हेराल्ड वर्तमानपत्रात आली आहे. त्यात टास्मानिया पोलिसांना (Tasmania Police) क्राऊन प्लाझा होबर्ट मधून सोमवारी सकाळी समारंभाच्या हॉलमध्ये काही मद्य प्यायलेले लोक आहेत अशी तक्रार मिळाली होती. त्यानंतर या पाहुण्यांनी सकाळी 6 वाजता पोलिसांशी चर्चा केली आणि त्याना जाण्यास सांगितल्यानंतर ते गेले. अशा आशयाची ही बातमी होती. पोलिसांनी या प्रकरणात पुढे कोणती कारवाई केलेली नाही.
Web Title: Tasmania Police Shut Down Post Ashes Party After Loud Music
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..