KL Rahul Wishes Wife Athiya Shetty Happy Birthday After Team India ODI WC 2023
KL Rahul Wishes Wife Athiya Shetty Happy Birthday After Team India ODI WC 2023

KL Rahul : 'जेव्हा मी तुटतो, तेव्हा तू...' भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यानंतर उपकर्णधारची 'ती' पोस्ट व्हायरल

KL Rahul Wishes Wife Athiya Shetty : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाने सलग आठ सामने जिंकले आहेत. भारताच्या आठव्या विजयानंतर संघाचा उपकर्णधार लोकेश राहुलने पत्नी अथिया शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अथिया शेट्टी आणि भारतीय फलंदाज विराट कोहली यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. भारताचा सामनाही त्याच दिवशी होता. अशा स्थितीत राहुलने आपले पूर्ण लक्ष सामन्यावर ठेवले. भारताच्या विजयानंतरच त्याने पत्नी अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

KL Rahul Wishes Wife Athiya Shetty Happy Birthday After Team India ODI WC 2023
SL Vs BAN : दिल्लीतील प्रदूषणामुळे श्रीलंका-बांगलादेश सामना रद्द? फुप्फुसरोग तज्ज्ञांचा ICC ला मोठा सल्ला

अथियासोबतचा एक फोटो शेअर करताना राहुलने लिहिले की, जेव्हा जेव्हा मी आतून तुटलेला असतो तेव्हा तू मला आधार देतेस. जेव्हा मी एकटा असतो तेव्हा तू माझ्या हृदया जवळ असते. तु कुठेही असलीस तरी मी त्यालाच माझे घर मानेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. आय लव्ह यू...

राहुलने अथियासोबत जो फोटो शेअर केला आहे, त्यात तो स्वत: दिसत नाही, पण अथिया दिसत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अथिया शेट्टी आणि लोकेश राहुलचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाला क्रिकेट आणि सिने जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अथियाच्या वाढदिवशी भारतीय संघाने शानदार खेळ केला आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि या वर्ल्ड कप सलग आठवा विजय नोंदवला. भारताने हा सामना 243 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. विराट कोहलीने वनडेतील 49 वे शतक झळकावत सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

त्याचवेळी रवींद्र जडेजाने पाच विकेट घेत भारताच्या मोठ्या विजयाचा पाया रचला. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उर्वरित दोन जागांसाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. पाकिस्तानही शर्यतीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com