राष्ट्रीय खो-खोमध्ये कोल्हापूर, महाराष्ट्र, विदर्भची विजयी वाटचाल कायम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

इचलकरंजी -  येथे सुरु असलेल्या 51 व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत कोल्हापूर, महाराष्ट्र, विदर्भने आपली विजयी वाटचाल कायम ठेवली आहे. रेल्वे व एअरपोर्ट अथोरिटीने ही आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. सायंकाळच्या सत्रात प्रेक्षणीय सामने होत आहेत. आज साखळी सामने संपले असून शनिवारपासून बाद फेऱ्या सुरु होणार आहेत 

इचलकरंजी -  येथे सुरु असलेल्या 51 व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत कोल्हापूर, महाराष्ट्र, विदर्भने आपली विजयी वाटचाल कायम ठेवली आहे. रेल्वे व एअरपोर्ट अथोरिटीने ही आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. सायंकाळच्या सत्रात प्रेक्षणीय सामने होत आहेत. आज साखळी सामने संपले असून शनिवारपासून बाद फेऱ्या सुरु होणार आहेत 

रोटरी क्‍लब आणि कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशन यांच्यातर्फे येथील जिमान्यसियम मैदानवर हे सामने सुरु आहेत. पुरुषांच्या रेल्वे विरुद्ध हरियाणा यांच्यात झालेल्या सामन्यात रेल्वे संघाने एक डाव 21 गुणांनी विजयी मिळवला. 

कोल्हापूर संघाने पंजाब संघावर एक डाव 9 गुणांनी विजयी. कोल्हापूरच्या विनायक पोकार्डे 2 मी 10 सेकंद पळती केली व 2 मी 20 सेकंदात 4 बळी घेतले. सागर पोतदार 2 मी 10 सेकंद पळती खेळू. व पंजाबच्या हरकिरत सिंगने 3 बळी घेतले. जम्मू आणि काश्‍मीर विरुद्ध एअरपोर्ट अथोरिटी यांच्यात झालेल्या सामन्यात एअरपोर्ट अथोरिटीने एक डाव 19 गुणांनी विजयी संपादन केला.एअरपोर्ट अथोरिटी च्या बाळासाहेब पोकार्डे याने 4 बळी, घेतले. उमेश सातपुतेने 2 मी 30 से व 1 मी 30 सेकंद पळती केली.

कर्नाटकने गोवावर एक डाव 3 गुणांनी विजयी मिळवला. छत्तीसगडने मध्य प्रदेश वर एक डाव 11 गुणांनी विजय नोंदवीला.केरळने राजस्थानला नमवत एक डाव 13 गुणांनी विजयी मिळवला. विदर्भ विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात विदर्भ संघाने एक डाव 11 गुणांनी विजयी मिळवला. विदर्भ संघातील प्रफुल्ल भांगे 1 मी 50 से पळती केली. झारखंडला तेलंगणाने नमविले व 2 गुण व 5 मी राखून विजयी मिळवला.तेलंगणाच्या- एम श्रीकांथ 1 मी 40 से पळती केली. 

महिला विभागातील सामन्यात महाराष्ट्रच्या संघाने एक डाव 14 गुणांनी उत्तर प्रदेश वर विजय मिळवला.महाराष्ट्र संघाची ऐश्वर्या सावंत 3 मिनीट 30 से व 4 बळी , अपेक्षा सुतार 3 मी 10 से व 1 बळी घेतले.सिक्कीम विरुद्ध आसाम यांच्यात झालेल्या सामन्यात आसामने एक डाव 10 गुणांनी विजयी मिळवला.एअरपोर्ट अथोरिटी यांच्यात ही सामना झाला. विदर्भवर एअरपोर्ट अथोरिटीने एक डाव 8 गुणांनी विजयी मिळवला. विदर्भच्या पायल जाधव 1 मी 20 से पळती केली.

केरळने मध्य प्रदेश वर एक डाव 14 गुणांनी विजय मिळवला.कोल्हापूर वाघाने राजस्थान विरुद्ध उत्कृष्ट खेळ केला आणि कोल्हापूरने एक डाव 13 गुणांनी विजयी मिळवला. कोल्हापूरची पूजा शेळके 2 मी पळती केली व 1 बळी ही घेतली. पूजा फाटक 1 मी 50 से पळती व 2 बळी मिळविले. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय नोंदविला. 

Web Title: Kolhapur News National Kho-Kho competition