कोल्हापूरात आजपासून रंगणार ‘आरपीएल’चा थरार

कोल्हापूरात आजपासून रंगणार ‘आरपीएल’चा थरार

कोल्हापूर - गेले अनेक दिवस उत्सुकता लागून राहिलेल्या सकाळ-रोटरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला आज (ता. ४) पासून प्रारंभ होणार आहे. मेरीवेदर मैदानावर डे-नाईट सामन्यांचा थरार रंगणार असून, मैदान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. 

दरम्यान, सकाळ माध्यम समूह व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीने ही स्पर्धा होत असून, ऋतुराज पाटील फाऊंडेशन स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहे. हॉटेल सिट्रस हॉस्पिटॅलिटी व डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय हे कॅप्स पार्टनर, तर रेडिओ सिटी हे रेडिओ पार्टनर आहेत. 

महापौर स्वाती यवलुजे, रोटरी-आरआयडी ३१७० चे डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्‍वस्त ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेरीवेदर मैदानावर सायंकाळी चार वाजता स्पर्धेचा दिमाखदार उद्‌घाटन सोहळा होईल. त्यानंतर स्पर्धेतील पहिला सामना प्रोफेशनल चॅलेंजर्स आणि मार्व्हलस सुपर रेंजर्स या दोन संघांत होईल. 

संग्राम पाटील (एमडब्ल्यूजी सुपर किंग्ज), अतुल पाटील (प्रोफेशनल चॅलेंजर्स), सुरजित पवार (मार्व्हलस सुपर रेंजर्स), डॉ. भारत खराटे (चाटे चॅम्प्स), राजेश आडके, गौतम परमार, सागर नालंग, हेमांग शहा (स्नॅप स्पेक्‍ट्रम), मोहन मुल्हेरकर, शरद पाटील, संजीव परीख, अजय कुलकर्णी (रोटरी क्‍लब, शिरोली एमआयडीसी वॉरियर्स), मनोज मुनीश्‍वर, अमित दड्डीकर, अनिकेत अष्टेकर (पास्ट रोटरॅक्‍टर्स), आनंद कुलकर्णी (बेलगाम ट्रेंड सेटर्स) या संघ मालकांनी आपापल्या संघांच्या सरावावर विशेष लक्ष दिले आहे. 

आता हे संघ ‘आरपीएल-२०१८’ चा मानकरी ठरण्यासाठी चौकार-षटकारांची आतषबाजी करणार आहेत. स्पर्धेला क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष संग्राम शेवरे, इव्हेंट चेअरमन आर. वाय. पाटील यांनी केले आहे.

दृष्टिक्षेपात ‘आरपीएल’

  • आठ संघांत चुरस

  • रोटेरियन्सच्या मैत्रीचे धागे अधिक घट्ट होणार

  • थंडीच्या साक्षीने रंगणार डे-नाईट सामने

  • खेळाडूंची जिगर लागणार पणाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com