तृप्ती माने हिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत कास्य पदक

राजेंद्र होळकर 
गुरुवार, 3 मे 2018

इचलकरंजी - येथील तृप्ती संजय माने हिने उझबेगिस्तान येथे झालेल्या युथ आशियाई 2018 मध्ये वेटलिफ्टींग स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. तिने मिळविलेल्या या यशाने इचलकरंजीच्या नावलौकीकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  

इचलकरंजी - येथील तृप्ती संजय माने हिने उझबेगिस्तान येथे झालेल्या युथ आशियाई 2018 मध्ये वेटलिफ्टींग स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. तिने मिळविलेल्या या यशाने इचलकरंजीच्या नावलौकीकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  

वेटलिफ्टींग स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरे पदक शहराला मिळाल्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ती शहरातील व्यकंटराव हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. 

उझबेगिस्तान येथील युथ आशियाई स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत वेटलिफ्टींग खेळात तृप्ती माने ही भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. तिने 58 किलो वजनी गटात 73 किलो स्नॅच व 91 किलो क्‍लीनजर्क असे एकूण 164 किलो वजन उचलून या स्पर्धेत कास्यंपदकांची कमाई केली. इचलकरंजीला या प्रकारात दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरातील क्रिडाप्रेमीच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

राष्ट्रीय स्तरावर ही सुवर्ण पदकांची कमाई 

तृप्ती माने हिने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर ही सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. उझबेगिस्तान येथील युथ आशियाई स्पर्धेसाठी हर्क्‍युलस जीम कुरुंदवाडचे प्रशिक्षक प्रदीप पाटील, विजय माळी, विश्‍वनाथ माळी, विजय टारे, रविंद्र चव्हाण, गणपती बरगाले आदीचे मार्गदर्शन तिला मिळत आहे. 

Web Title: Kolhapur News Trupti Mane wins Bronze