सिनियर्स जलतरण स्पर्धेत वीरधवल खाडे यास राैप्यपदक

संदीप खांडेकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

कोल्हापूर - सिंगापूर येथे सुरू असलेल्या लिबर्टी इन्शूरन्स ४९ व्या स्नॅग सिनियर्स जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या वीरधवल खाडे याने रौप्यपदक पटकाविले.

कोल्हापूर - सिंगापूर येथे सुरू असलेल्या लिबर्टी इन्शूरन्स ४९ व्या स्नॅग सिनियर्स जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या वीरधवल खाडे याने रौप्यपदक पटकाविले.

त्याने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात हे यश मिळविले. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पहिलेच पदक मिळविले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्याने जोरदार पुनरामगन केले. तो बंगळूर येथे प्रशिक्षक निहार अमीन यांच्याकडे सराव करत आहे. उद्या (ता. १७) तो ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात उतरेल. 

Web Title: Kolhapur Singapur News VeerDhaval Ghade silver Medal