कस्तुरी सावेकरकडून एव्हरेस्ट सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapuri girl kasturi savekar successfully summits mount everest kolhapur

कस्तुरी सावेकरकडून एव्हरेस्ट सर

कोल्हापूर : जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखरावर आज करवीरकन्या कस्तुरी सावेकर हिने भारताचा तिरंगा फडकवला. तिने आज सकाळी सहाच्या सुमारास ही मोहीम फत्ते केली. एव्हरेस्ट सर करणारी कस्तुरी दक्षिण महाराष्ट्रातील पहिलीच मुलगी ठरल्याची माहिती शनिवारी करवीर हायकर्सचे सिद्धार्थ पंडित, कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, कस्तुरी दोन दिवसांत बेसकॅम्पला येईल आणि त्यानंतर मेअखेरीस तिचे कोल्हापुरात आगमन होईल. गेल्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या कस्तुरीला खराब हवामानामुळे अगदी काही अंतरावरून खाली यावे लागले होते. मात्र, त्यामुळे न खचता तिने पुन्हा तयारी केली आणि २४ मार्चला माउंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ती रवाना झाली होती.

Web Title: Kolhapuri Girl Kasturi Savekar Successfully Summits Mount Everest Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top