वाढता वाढे कोहलीचे कसोटी मानांकन

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

दुबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या खात्यात सतत वाढणाऱ्या धावांप्रमाणे त्याचे कसोटी मानांकनही प्रत्येक धावेप्रमाणे वाढत आहे. मुंबईतील चौथी कसोटी संपल्यानंतर विराट कोहली कारकिर्दीमधील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानावर आला आहे. गोलंदाज अश्‍विनने गोलंदाजामधील अव्वल स्थान कायम राखले आहे.

दुबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या खात्यात सतत वाढणाऱ्या धावांप्रमाणे त्याचे कसोटी मानांकनही प्रत्येक धावेप्रमाणे वाढत आहे. मुंबईतील चौथी कसोटी संपल्यानंतर विराट कोहली कारकिर्दीमधील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानावर आला आहे. गोलंदाज अश्‍विनने गोलंदाजामधील अव्वल स्थान कायम राखले आहे.

आयसीसीच्या वतीने मंगळवारी नवी कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली. मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने 235 धावांची खेळी केली. कसोटीमधील ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. या सामन्यात त्याने 53 गुणांची कमाई केली. त्याचे आता 886 गुण झाले आहेत. क्रिकेटच्या तीनही प्रकारात क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर येण्यासाठी कोहलीला थोडेच गुण हवे आहेत. एकदिवसीय सामन्यात दुसऱ्या आणि टी- 20 क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. कसोटीत अव्वल स्थानावर असणाऱ्या स्टिव्ह स्मिथ आणि कोहली यांच्यात केवळ 11 गुणांचा फरक आहे. स्मिथला आपले अव्वल मानांकन टिकविण्याची संधी आगामी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून मिळेल.

कोहलीप्रमाणे गोलंदाजीत कमालीचे सातत्य राखणारा अश्‍विन गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान टिकवून आहे. अश्‍विनने यावर्षीच ऑक्‍टोबरमध्ये 900 गुण पूर्ण केले होते. मुंबई कसोटीनंतर त्याने अश्‍विनचे 904 गुण झाले असून, त्याने दुसऱ्या क्रमांकवरील श्रीलंकेच्या रंगना हेराथवर 37 गुणांची आघाडी घेतली आहे. अश्‍विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही 483 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमावरील बांगलादेशाच्या शकिब अल हसन याचे 405 गुण आहेत. इंग्लंडचा बेन स्टोक्‍स तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या मुरली विजय आणि जयंत यादव यांचेही स्थान सुधारले असून, विजय 24, तर यादव 56व्या स्थानावर आला आहे.
सांघिक क्रमवारीत भारताची आघाडी कायम आहे. त्यांचे 115 गुण झाले आहेत. त्यांच्यानंतर इंग्लंड (105), ऑस्ट्रेलिया (105), पाकिस्तान (102), दक्षिण आफ्रिका (102), न्यूझीलंड (96), श्रीलंका (96), वेस्ट इंडीज (69), बांगलादेश (65) आणि झिंबाब्वे (5) यांचा क्रमांक येतो.

कसोटी क्रमवारी ः 1) स्टिव्ह स्मिथ (897), 2) विराट कोहली (886), 3) ज्यो रुट (854), 4) केन विल्यम्सन (817), 5) हशिम आमला (791), 6) एबी डिव्हिलर्स (778), 7) डेव्हिड वॉर्नर (772), 8) चेतेश्‍वर पुजारा (756), 9) युनूस खान (753), 10) जेर्मी बेअरस्टॉ (751)

गोलंदाज ः 1) आर. अश्‍विन (904), 2) रंगना हेराथ (867), 3) डेल स्टेन (844), 4) जेम्स अँडरसन (815), 5) जोश हेझलवूड (815), 6) रवींद्र जडेजा (813), 7) स्टुअर्ट ब्रॉड (804), 8) मिशेल स्टार्क (787), 9) यासिर शाह (781), 10) नील वॅगनर (755).

. . . . . .

Web Title: kolhli's rank up in test cricket