पहिल्या दिवशी १२ फुटबॉल संघांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या फुटबॉल संघ नोंदणीला सुरवात झाली. पहिल्या दिवशी १२ संघ व ८० खेळांडूची नोंदणी ‘केएसए’कडे झाली. यामध्ये एका परदेशी, तर दोन पुण्यातील खेळाडूंचा समावेश आहे. शहरातील काही स्टार फुटबॉल खेळाडूंनीही यावर्षी संघबदल केला आहे. २७ पर्यंत नियमित, तर ३० पर्यंत विलंब नोंदणी सुरू राहणार आहे. 

नोंदणीत एका परदेशी तर पुण्यातील दोन खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय काही स्टार खेळाडूंनी संघबदल केल्याचेही 
दिसून आले. हमीद बलोगन या परदेशी खेळाडूची फुलेवाडी संघाकडून नोंदणी झाली. याशिवाय पुण्यातील रियाज यादगिरी याने फुलेवाडी, तर मयूर शेलारने संयुक्त जुना बुधवार संघाकडून नोंदणी केली. २७ ऑक्‍टोबरपर्यंत नियमित, तर त्यानंतर २९ व ३० ऑक्‍टोबरपर्यंत विलंब नोंदणी सुरू राहणार आहे. 

संघ बदल केलेले खेळाडू 
खेळाडू    आधीचा संघ    आताचा संघ 
सचिन बरामते    प्रॅक्‍टिस ‘अ’    संयुक्त जुना बुधवार 
दीपराज राऊत    खंडोबा    फुलेवाडी ‘अ’ 
नितांत कोरणे    शिवाजी तरुण मंडळ    मंगळवार पेठ 
मोहित मंडलिक    संध्यामठ    दिलबहार ‘अ’

नोंदणी झालेले संघ असे 
प्रॅक्‍टिस ‘अ’/‘ब’ 
संध्यामठ
बालगोपाल
फुलेवाडी
उत्तरेश्वर
संयुक्त जुना बुधवार
दिलबहार-‘अ’ 
मंगळवार पेठ 
ऋणमुक्तेश्वर
साईनाथ स्पोर्टस
पोलिस. 

Web Title: KSA football competition