BAN vs IND 1st Test : कुलदीप यादवने बांगलादेशला त्यांच्यात जाळ्यात अडकवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BAN vs IND 1st Test Kuldeep Yadav

BAN vs IND 1st Test : कुलदीप यादवने बांगलादेशला त्यांच्यात जाळ्यात अडकवले

Kuldeep Yadav Mohammed Siraj Shine : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताने बांगलादेशची अवस्था 8 बाद 133 धावा अशी केली. मोहम्मद सिराजने बांगलादेशची टॉप ऑर्डर उडवली तर कुलदीपने मधल्या फळीला खिंडार पाडले. कुलदीप यादवने बांगलादेशला त्यांच्याच फिरकीच्या जाळ्यात अलगद अडकवले. सिराजने 14 धावात 3 तर कुलदीपने 33 धावात 4 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव 404 धावात संपुष्टात आला. दुसऱ्या दिवशी आर. अश्विनने 58 धावा तर कुलदीप यादवने 40 धावांचे योगदान दिले.

हेही वाचा: Jalgaon Sports News : भुसावळची प्रियंका ठरली Best Boxer!

भारताने पहिल्या दिवशीच्या 6 बाद 278 धावांपासून पुढे खेळणाऱ्या भारताला लगेचच पहिला धक्का बसला. शतकाच्या जवळ पोहचलेला श्रेयस अय्यर 86 धावा करून बाद झाला. त्यानंतर अश्विन आणि कुलदीप यादव यांनी आठव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी रचत संघाला 400 च्या जवळ पोहचवले.

मात्र अश्विन अर्धशतकानंतर 58 धावांवरा बाद झाला. तर कुलदीप यादवने कसोटीतील सर्वोत्तम खेळी कर 114 चेंडूत 40 धावा केल्या. कुलदीप 40 धावांवर बाद झाल्यानंतर उमेश यादवने 10 चेंडूत नाबाद 15 धावा करत भारताला 404 धावांपर्यंत पोहचवले. बांगलादेशकडून तैजुल अहमद आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या.

हेही वाचा: Ind vs Ban 1st Test: अश्विन-कुलदीपने केली कमाल! टीम इंडियाचा पहिला डाव 404 धावांवर...

यानंतर लंचला काही वेळ शिल्लक असताना बांगलादेशने आपला पहिला डाव सुरू केला. मात्र मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचे एक एक फलंदाज हजेरी लावून जाऊ लागले. सिराज आणि उमेश यादव यांनी बांगलादेशची 4 बाद 56 दावा अशी अवस्था केली. यानंतर मुशफिकूर रहीमने बांगलादेशला सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र फिरकीपटू कुलदीप यादवने बांगलादेशची मधली फळी आपल्या फिरकती फसवली. त्याने त्याने मुशफिकूर (28), शाकिब (3), नरूल हसन(16) आणि तैजुल अहमद (0) यांची शिकार करत बांगलादेशची अवस्था 8 बाद 102 अशी केली. अखेर मेहदी हसन मिराजने इबादत सोबत दुसरा दिवस खेळून काढला. दिवस संपला त्यावेळी बांगलादेशच्या पहिल्या डावात 8 बाद 133 धावा झाल्या होत्या अजून बांगलादेश पहिल्या डावात 271 धावांनी पिछाडीवर आहेत.